आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Gautam Adani Road Show Update; Gautam Adani Vs Hindenburg Research | Adani Group | Gautam Adani

अदानी ग्रुपने 7374 कोटी रुपयांचे शेअर-बॅक्ड कर्ज फेडले:गुंतवणूकदारांच्या विश्वासासाठी दुबई, लंडन व अमेरिकेत रोड शो

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी समूह आजपासून अमेरिका, लंडन आणि दुबईमध्ये रोड शो करणार आहे. याला 'फिक्स्ड इन्कम रोड-शो' असे नाव देण्यात आले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे अदानी समूहावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे.

आता या रोड-शोच्या माध्यमातून अदानी समूह आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. रोड शोव्यतिरिक्त अदानी समूह गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी इतर अनेक प्रयत्न करत आहे.

7 मार्च ते 15 मार्चदरम्यान अदानी समूहाचा रोड शो

अदानी ग्रुप मॅनेजमेंटचे सदस्य आणि ग्रुप चीफ फायनान्शियल ऑफिसर जुगशिंदर सिंग हेदेखील रोड शोमध्ये सहभागी होतील. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, लंडन, दुबई आणि अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये 7 मार्च ते 15 मार्च या कालावधीत हे रोड शो होणार आहेत. या रोड-शोच्या माध्यमातून ते गुंतवणूकदारांना भेटू शकतील आणि गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढवतील, अशी समूहाला आशा आहे.

सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये झाले रोड शो

अदानी समूहाने सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये फिक्स्ड इन्कम रोड-शो केले होते, जे खूप यशस्वी झाले. या रोड शोनंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास बऱ्याच प्रमाणात बहाल झाला आहे. आता हा रोड-शो इतर देशांमध्ये केला जात आहे.

हिंडेनबर्गने समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशनचा केला आरोप

24 जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये बरीच अस्थिरता दिसून आली आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहाच्या कंपन्यांवर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडचा आरोप केला. मात्र, अदानी समूहाने हिंडेनबर्गचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

NSEचा अदानी समूहाला दिलासा

अदानी समूहाच्या अडचणी एकेक करून कमी होत आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला शॉर्ट-टर्म अॅडीशनल सर्विलांस फ्रेमवर्कमधून बाहेर काढले आहे. NSE ने 6 मार्च रोजी हा दिलासा दिला. गेल्या महिन्यात 6 फेब्रुवारी रोजी NSE ने अदानी एंटरप्रायझेस, अंबुजा सिमेंट्स आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनला स्टॉकमधील हाय व्होलॅटिलिटीमुळे शॉर्ट टर्म अॅडिशनल सर्व्हिलान्स मेजरमध्ये (ASM) ठेवले होते. दरम्यान, अंबुजा सिमेंट्स आणि अदानी पोर्टला या फ्रेमवर्कमधून आधीच काढून टाकण्यात आले आहे.

सोमवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 5.45% वाढले

सोमवारी म्हणजेच 6 मार्च रोजी अदानी समूहाच्या 10 पैकी 8 समभागांमध्ये वाढ झाली होती. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 5.45% वाढून 1,982 रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे, अदानी ट्रान्समिशन, विल्मर, पॉवर, टोटल गॅस, ग्रीन एनर्जी आणि एनडीटीव्हीचे समभाग प्रत्येकी 5-5% वाढले. अदानी पोर्ट्सने 0.49% वाढ नोंदवली. दुसरीकडे, समूहाची सिमेंट कंपनी ACCच्या शेअरमध्ये 1.53% आणि अंबुजामध्ये 1.80% ची घसरण दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...