आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतम अदानींनी घेतली शेख हसीना यांची भेट:अदानी म्हणाले- झारखंड प्लांटमधील पारेषणचे काम डिसेंबरला पूर्ण होणार, बांगलादेशाला वीज देणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची भेट घेतली. दरम्यान, गोड्डा वीज प्रकल्पांतर्गत पारेषण लाइनचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अदानी समूहाच्या 'अदानी पॉवर' या कंपनीने झारखंडमधील गोड्डा येथे 1600 मेगावॅटचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारलेला आहे.​​​​​ बांगलादेशला​​ पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड (BPDB) च्या पारेषण लाईनद्वारे वीज पुरवठा केला जाणार आहे. 2016 मध्ये हा करार झालेला होता.

शेख हसीना यांची भेट घेतल्यानंतर गौतम अदानी यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले की, 'बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना दिल्लीत भेटणे ही सन्मानाची गोष्ट आहे. बांगलादेशसाठी त्यांची दृष्टी प्रेरणादायी आणि धाडसी आहे. 16 डिसेंबर 2022 रोजी विजयी दिवसाला बांगलादेशला 1600 मेगावॅटचा गोड्डा ऊर्जा प्रकल्प आणि समर्पित ट्रान्समिशन लाइन सुरू करण्यासाठी आम्ही वचनबद्ध राहणार आहोत.

शेजारी प्रथम धोरणांतर्गत बांगलादेश हा महत्त्वाचा भागीदार
भारताच्या “शेजारी प्रथम” या धोरणांतर्गत बांगलादेश हा महत्त्वाचा भागीदार आहे. दोन्ही देशांमधील सहकार्याची व्याप्ती सुरक्षा, व्यापार, ऊर्जा आणि ऊर्जा, वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्र, नद्या आणि सागरी व्यवहार यासह अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या शेख हसीना यांनी सोमवारी नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा करून राजनैतिक बैठकीला सुरूवात केली.

2016 मध्ये झाला होता दोन प्लांट बांधण्याचा करार
झारखंड सरकार आणि अदानी पॉवरने फेब्रुवारी 2016 मध्ये प्रत्येकी 800 मेगावॅट क्षमतेच्या दोन प्रकल्पांच्या उभारणीसाठी करार केला होता. या अंतर्गत उत्पादित होणारी 1600 मेगावॅट वीज विशेष ट्रान्समिशन लाइनद्वारे थेट बांगलादेशला पाठवली जाणार आहे. त्याची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये बांगलादेश दौऱ्यात केली होती. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या दिल्ली भेटीदरम्यान यावर नंतर सहमती झाली.

गोड्डा येथील मोतिया गावात उभारण्यात येत असलेला प्लांट पाहण्यासाठी अदानी आले होते. येथे निर्माण होणारी वीज बांगलादेशला पुरवली जाणार आहे.
गोड्डा येथील मोतिया गावात उभारण्यात येत असलेला प्लांट पाहण्यासाठी अदानी आले होते. येथे निर्माण होणारी वीज बांगलादेशला पुरवली जाणार आहे.

वीज प्रकल्पासाठी भूसंपादन करणे अघवड बाब
एकेकाळी अदानीच्या पॉवर प्लांटसाठी भूसंपादन करणे मोठे आव्हानाचे काम होते. एसपीटी कायद्यामुळे जिल्ह्यात जमिनी मिळणे सोपे नव्हते आणि नुकसान भरपाईच्या रकमेसह इतर अनेक मुद्द्यांवर पोडईहाटचे आमदार प्रदीप यादव त्यांच्या समर्थकांसह याला थेट विरोध करित होते. त्यानंतर स्थानिक लोकांनी या परिसराच्या विकासासाठी आपल्या जमिनी दिल्या आणि आज कंपनी जवळपास तयार झाली आहे.

हे चित्र अदानी पॉवर प्लांटच्या जागेचे आहे. जेव्हा प्रकल्प सुरू झाला तेव्हाचे.
हे चित्र अदानी पॉवर प्लांटच्या जागेचे आहे. जेव्हा प्रकल्प सुरू झाला तेव्हाचे.
बातम्या आणखी आहेत...