आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानी समूहाचे प्रमुख उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी पुन्हा एकदा लवकरच विवाहसोहळा रंगणार आहे. कारण त्यांचा धाकट मुलगा जीत अदानी याचा साखरपुडा झाला आहे. जीतची होणारी पत्नी मुंबईतील हिरे व्यापारी यांची मुलगी आहे. दिवा जैमीन शहा असे नववधूचे नाव आहे. आता दिवा अदानी कुटुंबांची धाकटी सून आहे. दरम्यान, या लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
12 मार्च रविवारी रोजी गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याचा दिवा जैमीन शहा सोबत साखरपुडा झाला. गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका खाजगी सोहळ्यात एंगेजमेंट झाली. यामध्ये दोन्ही कुटुंबातील जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. अदानी यांची भावी सून दिवा शहा 'सी. दिनेश अँड कंपनी. प्रा. लि.' चे मालक जैमिन शहा यांची मुलगी आहे.
कोण आहे जीत अदानी
गौतम अदानी यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण अदानी आणि धाकट्याचे नाव जीत अदानी आहे. धाकटा मुलगा जीत अदानी याचा जन्म 7 नोव्हेंबर 1997 रोजी झाला. जीत अदानी यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. 2019 मध्ये जीत भारतात परतला. जीत अदानी आणि त्याचा मोठा भाऊ करण या दोघांनीही परदेशातून शिक्षण घेतले. जीतनेही वडील आणि भावाप्रमाणे व्यवसायात लक्ष्य ठेवले आहे.
जीत अदानी ग्रुपच्या व्यवसायात व्यस्त
जीत अदानी समूहाशी संबंधित आहेत. जीत अदानी यांची 2022 मध्ये अदानी समूहामध्ये उपाध्यक्ष (वित्त) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अदानी समूहाचा देशात आणि जगात मोठा व्यवसाय आहे. अदानी समूह मुख्यत्वे बंदरे, तेल आणि वायू उत्खनन, वीज निर्मिती, कोळसा व्यापार, गॅस वितरण आणि कोळसा खाण या व्यवसायात गुंतलेला आहे.
मोठा मुलगा करणचा विवाह 2013 मध्ये झाला
यापूर्वी, गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करणचा विवाह सुप्रसिद्ध कॉर्पोरेट वकील सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधीशी झाला होता. करण अदानी आणि परिधी यांचा विवाह 2013 मध्ये झाला होता. दोघांच्या लग्नाला पीएम मोदीही पोहोचले होते. विशेष बाब म्हणजे, करण अदानी सध्या अदानी पोर्ट अँड सेझ लिमिटेड (APSEZ) चे CEO आहेत.
हे ही वाचा सविस्तर
'हिंडेनबर्ग'ने आधीही अनेक कंपन्यांना कंगाल केले आहे:कोण आहेत याचे मालक? जे आता अदानींच्या मागे लागलेत
अशा स्थितीत आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की हे 'हिंडेनबर्ग' काय आहे, ही कंपनी काय करते, तिचा मालक कोण आहे, हा अहवाल का जारी केला? - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.