आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्सला जोरदार धक्का बसला. शेअर्सच्या घसरणीमुळे अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे जगातील श्रीमंतांच्या यादीतील क्रमवारीत पहिल्या तीन लोकांत असणारे अदानी थेट 17 व्या स्थानावर फेकले गेले. यानिमित्ताने आता श्रीमंताच्या क्रमवारीत कोण किती श्रीमंत झाले आणि कोण गरीब झाले याची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया.
जगभरातील श्रीमंत लोकांचे नशीब अवघ्या दहा दिवसात बदलले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या क्रमवारीत आता सातत्याने घसरण होत आहे. चार दिवसांपूर्वी अदानी समूहाने आपली प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस (एपीएल) ची पूर्ण सदस्यता घेतलेली एफपीओ काढून घेतली. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल (Mcap) जवळपास 50 टक्के घसरले आहे.
तिसऱ्यास्थानावरून 17 क्रमांकावर पोहोचले गौतम अदानी
24 जानेवारीपर्यंत गौतम अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. परंतू हिंडेनबर्गच्या अहवालानंतर त्यांच्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी घट झाली. ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतून खाली घसरले आहेत. गेल्या आठवड्यात गौतम अदानी यांच्या संपत्तीत 35 अब्ज डॉलरची घट झाली. एकूणच, गेल्या दोन आठवड्यांत त्याची निव्वळ संपत्ती निम्म्यावर आली आहे. आता ते मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या मागे आहेत. फोर्ब्सच्या ताज्या रँकिंगनुसार, गौतम अदानी हे $61.7 अब्ज संपत्तीसह जागतिक स्तरावर 17 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
दुसऱ्या क्रमांकावरही बाजी मारली होती अदानींनी
अदानी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील 10 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनले होते. सप्टेंबरमध्ये, गौतम अदानी 155 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीच्या रँकवर पोहोचले. पण या वर्षी जानेवारीच्या अखेरीस आलेल्या हिंडेनबर्गच्या अहवालाने त्यांना चांगलाच धक्का दिला आहे.
मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती झपाट्याने वाढली
मेटाच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत $12 बिलियनची वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीश ट्रॅकरनुसार, झुकेरबर्ग आता 66.8 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 16 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
ट्विटर मालक एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ
25 जानेवारीच्या चौथ्या तिमाहीच्या अहवालात टेस्लाची कमाई अपेक्षेपेक्षा चांगली होती. त्यामुळे समभागासाठी हा आठवडा चांगला होता. तो 7 टक्क्यांपर्यंत चढला. यामुळे एलन मस्क यांच्या संपत्तीत 2.9 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. LVMH च्या बर्नार्ड अर्नाल्ट नंतर मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
टॉप-10 मध्ये फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स
या आठवड्याच्या सुरुवातीला, जगातील शीर्ष 10 श्रीमंत लोकांमध्ये सर्व पुरुषांचा समावेश आहे. पण शुक्रवारी त्यात बदल झाला. जेव्हा फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स टॉप-10 मध्ये पोहोचल्या आहेत. त्यांची सौंदर्य प्रसाधने कंपनी L'Oreal S.A Ltd आहे. ज्याचे शेअर्स शुक्रवारी जवळपास 2 टक्क्यांनी वाढले होते. मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर हे अकराव्या क्रमाकांवर आहेत. भारताचे मुकेश अंबानी 12 व्या क्रमांकावर आहेत.
मार्क झुकरबर्गचा सर्वाधिक फायदा
एस अॅण्ड पी 500 या आठवड्यात 1.6 टक्के आणि Nasdaq 3.3 टक्क्यांनी वर होता. मेटा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या शेअर्समध्ये या आठवड्यात 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, आठवडाभरात सर्वात मोठा फटका अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना बसला आहे. तेव्हापासून अदानी समूहाचे शेअर्सला उतरण लागली आहे.
हे ही वाचा
मुकेश अंबानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती:गौतम अदानींना टाकले मागे, फोर्ब्सचा अहवाल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना श्रीमंताच्या यादीत मागे टाकले आहे. 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
अदानी समूहच नाही, 36 कंपन्यांत LICची गुंतवणूक:6 महिन्यांत एलआयसीच्या मूल्यात 58% घसरण
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अर्थात एलआयसीने अदानी समूहासोबत अन्य 36 कंपन्यांमध्ये गुतंवणूक केली आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स सातत्याने घसरत आहे. त्यामुळे एलआयसी कंपनीला देखील फटका बसत आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.