आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
या वित्त वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील देशाच्या जीडीपीचे अधिकृत आकडेवारी शुक्रवारी जारी होतील. लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता देण्यासोबत आर्थिक उत्पादनांनी वेग पकडला आहे. या पार्श्वभूमीवर पतमानांकन संस्था आणि अर्थतज्ज्ञांनी जीडीपी विकास दरात जून तिमाहीच्या स्तरापासून १३.२-१७.९% पर्यंत सुधारणेची अपेक्षा व्यक्त करत आहे.
त्यांनी सप्टेंबर तिमाहीत जीडीपी विकास दर -६% ते-१०.७% पर्यंत नोंद होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे कोरोनाला अटकाव करण्यासाठी लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जूनच्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दरात विक्रमी २३.९% ची घसरण नोंदली होती.
अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा सुधारणा : शक्तिकांत
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यानुसार, अर्थव्यवस्थेत सुधारणा अपेक्षेपेक्षा चांगली आहे. कोरोना प्रकरणांत वाढ होत आहे. अशात सणासुदीनंतर मागणी कशी राहते हे महत्त्वाचे आहे. यासोबत त्यांनी अनेक राज्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू केला जात असल्याबाबतही इशारा दिला. ते एफडीएआयच्या कार्यक्रमात बोलत होते.
विकास दराबाबत विविध संस्थांनी व्यक्त केलेला अंदाज
आरबीआय 8.6%
मूडीज -10.6%
केअर रेटिंग्ज -9.9%
एसबीआय रि. -10.7%
इक्रा -9.5%
क्रिसिल -12%
मॉर्गन स्टॅनली -6%
आयसीआयसीआय
सिक्युरिटीज प्रायमरी
डीलरशिप -8.2%
बोफा 7.8%
बार्कलेज -8.5%
या क्षेत्रांत सुधारणेचा अंदाज
- कृषी
- बँकिंग-फायनान्स
- सेवा
- एफएफसीजी
- रिअल एस्टेट
- मॅन्युफॅक्चरिंग
क्यू-२ मध्ये लिस्टेड कंपन्यांची विक्रमी कमाई
सुमारे ४ हजार लिस्टेड कंपन्यांनी जुलैपासून सप्टेंबरच्या तिमाहीत १.५ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला. हा काेणत्याही तिमाहीत सर्व लिस्टेड कंपन्यांचा आतापर्यंतचा सर्वात जास्त नफा आहे. हा याच्या मागील विक्रमापेक्षा ३०.९% जास्त आहे. २०१३-१४ च्या चौथ्या तिमाहीत ४,८५४ कंपन्यांनी १.१८ लाख कोटी रु. होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.