आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अर्थव्यवस्था:जीडीपी 4.2% वर, गेल्या 11 वर्षांतील नीचांक, दरडोई उत्पन्न वाढून 1.34 लाख

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी 2009 मध्ये जीडीपी या पातळीजवळ आला होता
Advertisement
Advertisement

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला धक्के बसत असताना केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी २०१९-२०साठी जीडीपी वृद्धीदराची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) जीडीपी कमी होऊन ३.१ टक्के झाला. तर, संपूर्ण आर्थिक वर्षासाठी हा दर ४.२ टक्के राहिला. ११ वर्षांतील हा नीचांक आहे. यापूर्वी २००९ मध्ये जीडीपी या पातळीजवळ आला होता. जानेवारीमध्ये सरकारने या वर्षात जीडीपी ५ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, ही आकडेवारी त्यापेक्षा ०.८ टक्के कमी आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात जीडीपीचा वृद्धीदर ६.१ टक्के होता.

दरडोई उत्पन्न वाढून १.३४ लाख : २०१९-२०मध्ये दरडोई उत्पन्न ६.०९ टक्के वाढून (७,७०५ रु.) १,३४,२२६ रुपये झाले. गेल्या आर्थिक वर्षात ते १,२६,५२१ रुपये होते.

विकास दर उणे पातळीत?

अर्थतज्ञांनुसार, लॉकडाऊनमुळे विकास दर उणे पातळीवर जाऊ शकतो. चालू आर्थिक वर्षात तो ४५ टक्केपर्यंत घसरू शकतो. सध्या पर्यटन, उड्डयण इत्यादी क्षेत्र ठप्प आहेत. लघुउद्योगांचीही अवस्था अत्यंत वाईट आहे.

Advertisement
0