आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी अर्थव्यवस्था:जीडीपीत अंदाजापेक्षा कमी वाढ, तिमाहीत 0.6% घसरण

न्यूयॉर्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षे २०२२ च्या दुसऱ्या ितमाहीत अमेरिकी अर्थव्यवस्थेत अंदाजापेक्षा कमी घसरणीची नोंद झाली. ही एप्रिल-जूनच्या तिमाहीत वार्षिक आधारावर मायनस ०.६ टक्क्याची नोंद झाली. सुरुवातीला उणे ०.९% नोंदवण्याचा अंदाज होता. ग्राहकांच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपन्यांमध्ये स्टॉक वाढण्याचा वेग थोडा मंदावला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती कमी झाली आहे. याच्या मागील जानेवारी-मार्चच्या तिमाहीत अमेरिकेचा जीडीपी विकास दर मायनस १.६ टक्के नोंद झाला होता. सलग दोन तिमाहीत जीडीपीच्या वाढीतील घसरण ही यूएस तांत्रिकदृष्ट्या मंदीत असण्याची मानक व्याख्या पूर्ण करते. परंतु आर्थिक क्रियाकलाप वाढवण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांमुळे मोठ्या अर्थव्यवस्थेत अतिशय मंद गतीने वाढ झाल्याचे दिसून येते.

युरोपात आधीच मंदीची लाट : युरोपात आधीपासूनच मंदी पसरली आहे. एनर्जीच्या वाढत्या किमतीने ते आणखी वाढवण्याचे काम केले आहे. ही दरवाढ या वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार असल्याचे यूबीएस ग्रुपच्या अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...