आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तात्काळ कर्ज:बजाज फिनसर्व्हच्या तात्काळ व्यक्तिगत कर्जाच्या साह्याने तातडीच्या गरजा भागवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100% ऑनलाइन डिस्बर्सल आणि पेपरलेस अर्जप्रक्रिया यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे तुम्ही घरबसल्या, फक्त दोन क्लिक्सच्या साह्याने कर्ज मिळवू शकता

कोणतीही आर्थिक आणीबाणीची परिस्थिती, खासकरून तुमच्या व्यवसायाशी किंवा आरोग्याशी संबंधित निकड उद्भवते तेव्हा पैसे गोळा करण्यासाठी एकेक सेकंद महत्त्वाचा असतो. अशा ऐनवेळेच्या खर्चाच्या तोंडमिळवणीसाठी बचत वापरण्याचा पर्याय अशा वेळी योग्य वाटतो, पण त्यातून जवळची सगळी शिल्लक संपण्याचा आणि रक्कम कमी पडण्याचा धोका संभवतो. अशा अतिशय तातडीच्या क्षणांमध्ये आर्थिक गरज भागवण्यासाठी तात्काळ व्यक्तिगत कर्ज हा एक उत्तम वित्तीय पर्याय ठरू शकतो. खरेतर बजाज फिनसर्व्हसारख्या कर्जपुरवठादार कंपन्या अर्हताप्राप्त पूर्व-मंजूर ग्राहकांना 100% डिजिटल डिस्बर्सल आणि संपूर्णपणे ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज उपलब्ध करून देत आहेत. त्याचबरोबर पेपरलेस मंजुरी आणि कमीत कमी कागदपत्रांच्या आवश्यकतेमुळे ग्राहकांना कमीत कमी वेळात- म्हणजे अगदी 20 मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी वेळात कर्ज उपलब्ध होते. बजाज फिनसर्व्ह व्यक्तिगत कर्ज आर्थिक आणीबाणीच्या प्रसंगी तुमची कशी अचूक वेळेवर आणि घरबसल्या सोडवणूक करते, ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

1. अडचणीच्या प्रसंगी भरपूर निधीचा आधार मिळवा

तुमच्या अर्हतेनुसार बजाज फिनसर्व्ह तुम्हाला पूर्व-मंजूर कर्जाच्या ऑफरनुसार मोठी कर्ज रक्कम देऊ करते. या मंजुरीच्या आधारे तुम्ही तुमच्या आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर येण्यासाठी कर्जाचा वापर करू शकता कारण या रकमेच्या वापराच्या संदर्भात कसलेही निर्बंध नाहीत. तुम्ही उच्च व्याजदराच्या कर्जाचा डोंगर वाढण्यापासून रोखू शकता, व्यावसायिक गरज भागवू शकता किंवा वैद्यकीय बिलेही भरू शकता. या कर्जाच्या काही भागातून तुम्ही घराच्या नूतनीकरणाचे अनियोजित खर्चही भागवू शकता.

2. तारणाशिवाय तात्काळ वित्तपुरवठा मिळवा

आणीबाणीचे स्वरूप असे असते की ती कसलीही पूर्वसूचना न देता येते. अशा परिस्थितीत बजाज फिनसर्व्हचे कर्ज हा एक चांगला उपाय ठरू शकतो कारण हा तारणमुक्त वित्तपुरवठा आहे. मालमत्ता ठरवा,तिच्या मूल्यांकनासाठी कागदपत्रे जमवा, हे सगळे करावे लागत नाही. हाताशी असलेल्या पेचप्रसंगातूनबाहेर पडण्यावर सगळी ऊर्जा केंद्रित करू शकता.
3. फक्त दोन क्लिक्सच्या साह्याने 20 मिनिटांत कर्ज मिळवा बजाज फिनसर्व्हचे अर्हताप्राप्त ग्राहक म्हणून तुम्ही पूर्व-मंजूर कर्ज व्यवहाराच्या अंतर्गत आणीबाणीच्या प्रसंगी मोठ्या रकमेचे कर्ज मिळवू शकता. एका अतिशय साध्या आणि वेगवान नो-टच प्रक्रियेमुळे तुम्ही पेपरलेस मंजुरी मिळवता आणि 100% ऑनलाइन डिस्बर्सलच्या माध्यमातून खात्यात 20 मिनिटांत पैसे
जमा होतात. तुम्हाला फक्त आधीच भरलेला Loan Application Form ऑनलाइन व्हेरीफाय करायचा असतो. तुम्ही तो तपासून सबमिट केलात की अवघ्या दोन क्लिक्समध्ये तुम्हाला वित्तपुरवठा मिळतो.

4. वेळ आणि कष्ट वाचवा – कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही
कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी, खासकरून वैद्यकीयदृष्ट्या निकडीचा प्रसंग ओढवला असेल तर तुम्हाला औपचारिकता पूर्ण करत आणि कागदपत्रांची पूर्तता करत इकडून तिकडे धावण्यासाठी वेळ असत नाही. मात्र, बजाज फिनसर्व्हच्या पूर्व-मंजूर ऑॅफरमधून कर्ज घेतले तर सोयीस्कर ऑनलाइन प्रक्रियेमुळे तुमची धावपळ आणि कष्ट वाचतात. शिवाय तुम्ही बजाज फिनसर्व्हचे विद्यमान ग्राहक असाल तर तुम्हाला पेपरलेस प्रक्रियेचाही लाभ मिळतो.
5. कोणत्याही नंतर फुगवल्या जाणाऱ्या छुप्या शुल्कांची जोखीम नाही आर्थिक आणीबाणीच्या प्रसंगी पैशांची जमवाजमव करताना तुम्ही फाइन प्रिंट अर्थात बारीक अक्षरांमध्ये लिहिलेल्या अटी आणि शर्ती वाचायला विसरू शकता, ज्यामुळे नंतर आपल्या कर्जाची किंमत वाढवणारी
छुपी शुल्के पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. मात्र, बजाज फिनसर्व्हच्या व्यक्तिगत कर्जाच्या संदर्भात तुम्हाला छुप्या शुल्कांची धास्ती नाही, तुम्ही प्रक्रिया शुल्क, प्रि-पेमेंट शुल्क यांसारख्या सर्व संबंधित खर्चांचा ताळेबंद तपासून कर्जाच्या एकूण किंमतीचा आकडा समजून घेऊ शकता.

6. लवचीक मुदतीच्या साह्याने कर्जाची सुलभतेने परतफेड करा

बजाज फिनसर्व्ह तुमच्या सोयीनुसार तुम्हाला परतफेडीसाठी 60 महिन्यांपर्यंतची लवचीक मुदत देते. धोरणीपणाने कर्ज घेताना परतफेडीचे नियोजन करणे फारच महत्त्वाचे असते आणि लवचीक मुदतीमुळे तुम्ही तुमचे मासिक उत्पन्न, तुमच्याकडील तरतूद यांची सांगड घालून हप्ते ठरवून घेऊ शकता. या सर्व फायद्यांमुळे कधीही आर्थिक पेचप्रसंग उद्भवल्यास बजाज फिनसर्व्ह व्यक्तिगत कर्जाच्या साह्याने तुम्ही त्यांचा सामना करू शकता. तुमच्या कर्जपरतफेडीचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही व्यक्तिगत कर्जाच्या ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करून सुलभतेने आपल्या वित्ताचे व्यवस्थापन करू शकता. भारतातील सर्वोत्तम व्यक्तिगत कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही फक्त एकच करायचे आहे तात्काळ वित्तपुरवठ्यासाठी check your pre-approved offer या लिंकच्या माध्यमातून आपली पूर्व-मंजूर ऑफर जाणून घ्यायची आहे.

बातम्या आणखी आहेत...