आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील बँकिंग क्षेत्र आव्हानात्मक स्थितीचा सामना करतेय. अमेरिका आणि युरोपात काही बँका बंद झाल्या आहेत आणि क्रेडिट सुइससारख्या मोठ्या बँका विक्री निघाल्या आहेत.
मात्र भारतीय बँक व्यवसाय वाढवत आहेत. त्यामुळे मार्चमध्ये बँकांनी विक्रमी ४,५५५ नोकऱ्यांची भरती काढली होती. त्याच्या तुलनेत मार्च, २०२२ दरम्यान बँकांमध्ये ३,१३८ नोकऱ्यांची भरती निघाली होती. नोकरी डॉट कॉमच्या जॉबस्पीक ट्रेंड अहवालानुसार, गेल्या महिन्यात बँकिंग क्षेत्रात नोकरभरती मार्च २०२२च्या तुलनेत ४५%जास्त निघाल्या. यादरम्यान विमा क्षेत्रात सर्वात जास्त १०८% नव्या नोकऱ्या आल्या. बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा क्षेत्र सोडले तर, गेल्या महिन्यात उर्वरित क्षेत्रांमध्ये फक्त ५% नोकऱ्या रिक्त आहेत.
सरासरी वेतन 12 लाखांपर्यंत जॉब ऑफर सरासरी वेतन पोर्टफोलिअो मॅनेजर 11.50 रिस्क मॅनेजर 9.00 इन्व्हेस्टमेंट बँकिंग अॅनालिस्ट 7.00 बँक ऑफिसर 2.50 लोन ऑफिसर 2.25 ( वार्षिक वेतन लाख रुपयांत)
भारताची स्थिती चांगली ^वाढती महागाई, आव्हानात्मक जागतिक आर्थिक स्थिती पाहता भारताची बीएफएसआय लेबर मार्केट विकसित देशाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. - शशी कुमार, सेल्स हेड, इंडीड इंडिया
पोर्टफोलिअो मॅनेजरला सर्वात जास्त पगार एका इतर नोकरीची साइट इंडीडच्या मते, बीएफएसआय क्षेत्रात पोर्टफोलिअो मॅनेजर आणि रिस्क मॅनेजरला सर्वात जास्त पगाराचा ऑफर आला आहे. फेब्रुवारी २०२० ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान फायनान्स मॅनेजर, वेल्थ मॅनेजर आणि क्रेडिट मॅनेजर यांचा टॉप-१० सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्यांमध्ये समावेश करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.