आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Global Recovery Boosts Stock Markets, Sensex Hits Record Highs, Gains 17% In Six Months

शेअर बाजार:ग्लोबल रिकव्हरीमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स सर्वोच्च पातळीवर, सहा महिन्यांतच 17% वाढ

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी तेजी होती. सेन्सेक्स १,१८१ अंकांनी वाढून ६१,७९५ वर बंद झाला. ही सेन्सेक्सची गेल्या एक वर्षातील सर्वोच्च पातळी आणि आतापर्यंची सर्वोच्च बंद पातळी आहे. सर्वोच्च पातळी ६२,२४६ असून ती १९ ऑक्टोबर २०२१ रोजी झाली होती. शुक्रवारी मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जास्त खरेदी राहिली. लार्ज कॅप इंडेक्स १.६९% वाढून बंद झाला. तथापि, मिडकॅपमध्ये ०.१५% आणि स्मॉल कॅपमध्ये ०.३३% ची किरकोळ वाढ राहिली. महत्त्वाचे म्हणजे सेन्सेक्समध्ये ६ महिन्यांतच १७.६९% ची वाढ नोंदवली गेली. असा ट्रेंड जगातील एकाही बाजारात राहिला नाही. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बाब म्हणजे शुक्रवारी रुपया मजबूत होता. डॉलरच्या तुलनेत रुपया ६२ पैसे मजबूत होऊन ८०.७८ झाला.

अमेरिकेतील महागाईचे आकडे गुरुवारी जाहीर झाले होते. यात केवळ ०.५% घसरण झाली. ही बाजाराच्या अपेक्षेपेक्षा जास्त होती. यानंतर अमेरिकेचा शेअर बाजार नॅसडॅकने सर्वाधिक ७.३५% पर्यंत उसळी घेतली. शुक्रवारी हा ट्रेंड जगभरात पाहायला मिळाला.

अमेरिकन बाजार एका वर्षात ३५ टक्क्यांपर्यंत कोसळले, भारतात तेजी

सेन्सेक्स २.३९% अमेरिका डाऊ जोन्स -९.९३% नॅसडॅक -३४.७३% एसअँडपी ५०० -१९.९५% आशिया हँगसेंग (हाँगकाँग) -३१.५९% निक्केई (जपान) -४.५५% कोस्पी (द. कोरिया) -१६.३६% युरोप एफटीएसई (यूके) -०.०८% कॅक (फ्रान्स) -७.१६% डॅक्स (जर्मनी) -११.८४%

देशात १ वर्षात सर्वाधिक ३९% रिटर्न ऊर्जा क्षेत्रात

एका वर्षात परतावा ऊर्जा ३९.००% युटिलिटीज २९.३५% औद्योगिक १७.२२% कॅपिटल गुड्स १६.०४% एफएमसीजी १३.६४% ऑटो १२.६६% बँक ७.९०% मेटल ०.३५% टेलिकम्युनिकेशन -१.६३% आरोग्यसेवा -६.६७% टेक -१०.५९% आयटी -१४.५६%

प्रत्यक्ष कर संकलन ३१% वाढून १०.५४ लाख कोटी झाले नवी दिल्ली | चालू आर्थिक वर्षात १० नोव्हेंबरपर्यंत सकल प्रत्यक्ष कर संकलन ३१% वाढून १०.५४ लाख कोटी झाले आहे. यात वैयक्तिक आयकराच्या उत्तम कामगिरीचे विशेष योगदान आहे. रिफंडनंतर एकूण कर ८.७१ लाख कोटी राहीला. तो सामान्य बजेटमध्ये संपूर्ण वर्षासाठी निर्धारित लक्ष्याच्या ६१.३१% आहे. आतापर्यंत १.८३ लाख कोटींचे रिफंड झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...