आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील विमान क्षेत्रासाठी वाईट बातमी म्हणावी लागेल. देशांतर्गत बाजारात ७% वाटा असलेली गो-फर्स्ट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. गो-फर्स्टने ३ व ४ मेची सर्व उड्डाणे रद्द केली. विमान प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत केली जाईल. वाडिया समूहाच्या या कंपनीने एनसीएलटीमध्ये व्हॉलंटियर इन्सॉल्व्हन्सी प्रोसिडिंगसाठी अर्ज केला आहे.
कंपनीचे सीईआे कौशिक खोना यांनी ही माहिती दिली. खोना म्हणाले, आमच्या एकूण ५७ पैकी २८ विमाने उड्डाण करू शकलेले नाहीत. कारण इंजिन तयार करणाऱ्या प्रॅट अँड व्हिटनीने इंजिन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निधीचा जास्त तुटवडा निर्माण झाला. एअरलाइनजवळील रोख संपली आहे. कंपनीला तेल कंपन्यांची थकबाकी भरणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या तेल कंपन्यांनी तेल देण्यास नकार दिला आहे. सीईआे खोना म्हणाले,हा दुर्दैवी निर्णय आहे. परंतु कंपनीच्या हितासाठी नाइलाजाने हे पाऊल उचलावे लागले. त्यात डीजीसीएने गो-फर्स्टला कारणे दाखवा नोटीस पाठवली. पूर्वकल्पना न देता उड्डाणे का रद्द करण्यात आली अशी विचारणा यातून करण्यात आली आहे.
कंपनीकडून २४ तासांत जबाब मागवण्यात आला आहे. गो-फर्स्टने जुलै २२२ मध्ये पहिल्यांदा विमानांना ग्राऊंड केले होते. तेव्हापासून कंपनीचा मार्केट शेअर सातत्याने घसरत आहे. फेब्रुवारीत ८ टक्क्यांवर आला. गेल्या वर्षी मे मध्ये तो ११ टक्के होते. २०२१-२२ मध्ये कंपनीला २१.८ कोटी डॉलर (सुमारे १७८५ कोटी रुपये) एवढा तोटा झाला होता. गेल्या वर्षी तो १०.५ काेटी डॉलर (सुमारे ८६० कोटी रुपये) एवढा होता.
तुमच्यासाठी हे जाणून घेणे गरजेचे
गो-फर्स्टने दिवाळीखोरी जाहीर करण्यासाठी अर्ज दिला आहे, पुढे काय?
एनसीएलटीकडे अर्ज केल्यानंतर व्यावसायिक कंपनीचे टेकआेव्हर करून संचालन केले जाते. गो-फर्स्टच्या संकेतस्थळावर ३,४ व ४ मे ची उड्डाणे रद्द झाल्याची माहिती आहे. ६ मेपासून तिकिटे उपलब्ध आहेत. परंतु प्रवासी आता त्यावर विश्वास कसा ठेवतील, हा प्रश्न आहे.
विमान क्षेत्रावर काय परिणाम होईल?
कंपनीचा देशांतर्गत बाजारातील वाटा ७ टक्के आहे. दररोज एकूण ४ लाख प्रवासी असतात. त्यामुळे २८ ते ३० हजार प्रवाशांचा बोजा इतर एअरलाइन्सवर पडणार आहे. दुसरीकडे विमान कंपन्यांत वैमानिकांची मागणीही वाढली आहे. विस्ताराचे प्रयत्न करणाऱ्या इंडिगो व टाटा ग्रुपसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते.
अशा स्थितीत केंद्र काय करेल?
२०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर डिसेंबरमध्ये स्पाइसजेट संकटात सापडले होते. कसेबसे कंपनीस अस्तित्व टिकवता आले. अशाच प्रकारे एप्रिल २०१९मध्ये जेट एअरवेजची स्थिती बिघडली होती. परंतु सरकारने थेट मदत देणे टाळले. या वेळी हस्तक्षेपाची शक्यता कमी वाटते.
गो-फर्स्टने काय पावले उचलली?
स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरचा शाेध घेतला जात आहे. अनेक गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे.
आतापर्यंत गो-फर्स्टने काय केले?
कंपनीने प्रॅट अँड व्हिटनीच्या विरोधात अमेरिकेच्या कोर्टात खटला गुदरला. एक निवाडा त्यांच्या बाजूने झाला. परंतु इंजिन मिळाले नाही तर एअरलाइन बंद पडेल, असे म्हटले जाते.
देशातील इतर कंपन्यांचा वाटा किती?
विमान क्षेत्रात २०२१-२२ मध्ये इंडिगोचा मार्केट शेअर सर्वाधिक ५३.७%, एअर इंडियाचे १०.५%, स्पाइसजेट १०.३%, गो-फर्स्ट-९.२% , विस्तारा-९.२%, एअर एशियाचा ६.३% वाटा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.