आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक चणचणीचा सामना करणारी गो फर्स्ट ही एअरलाईन लवकरच दिवाळखोर होऊ शकते. कंपनीने 3 व 4 मेसाठीची बूकिंग बंद केली आहे. इंधन कंपन्यांना पैसे देऊ न शकल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
गो फर्स्ट ही कॅश अँड कॅरी मोडवर फ्लाइट ऑपरेट करते. म्हणजेच एअरलाईन्सला दररोजच्या हिशेबाने जितकी उड्डाणे आहेत, त्यानुसार इंधनासाठी पेमेंट करावे लागते.
दिवाळखोरीच्या तोडग्यासाठी अर्ज
एअरलाईनने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल दिल्लीकडे स्वैच्छित दिवाळखोरी तोडगा कार्यवाहीसाठी एक अर्जही दिला आहे. एअरलाईनचे प्रमुख कौशिक खोना यांनी म्हटले- इंजिन्सना सप्लाय नसल्याने एअरलाईनने आपल्या ताफ्यातील 28 विमाने ग्राऊंडेड केली आहे. यामुळे फंडची चणचण निर्माण झाली.
ते म्हणाले की, दिवाळखोरीच्या कार्यवाहीकडे जाणे हा एक दुर्दैवी निर्णय आहे. मात्र कंपनीच्या हितांच्या रक्षणासाठी असे करणे गरजेचे आहे. एअरलाईनने या घटनाक्रमाविषयी सरकारला माहिती दिली आहे. कंपनी डीजीसीएलाही एक सविस्तर अहवाल सोपवेल असे ते म्हणाले.
इंजिनचा सप्लाय नसल्याने कॅशची समस्या
इंजिनच्या सप्लायशी संबंधित समस्येमुळे एअरलाईन या स्थितीत पोहोचली आहे. एअरक्राफ्ट इंजिन मॅन्युफॅक्चरर प्रॅट अँड व्हिटनी गो फर्स्टला इंजिन सप्लाय करणार होती. मात्र ते वेळेवर याचा सप्लाय करू शकले नाही.
अशात गो फर्स्टला आपल्या 61 विमानांच्या ताफ्यातील अर्ध्यापेक्षा जास्त विमाने ग्राऊंडेड करावी लागली. विमानांची उड्डाणे न झाल्याने कंपनीसमोर कॅशची अडचण निर्माण झाली आणि दैनंदिन कार्यान्वयनासाठीही कंपनीकडे पैसे उरले नाही.
कंपनीची अमेरिकेच्या कोर्टात याचिका
कंपनीने अमेरिकेच्या डेलावेयरमधील कोर्टात याचिका दाखल केली आहे. यात कंपनीने दावा केला आहे की लवकर इंजिनचा पुरवठा झाला नाही तर कंपनी दिवाळखोरीत निघेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.