आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशांतर्गत बाजारात गेल्या महिन्यात सोन्याच्या किमती ५ टक्क्यांपेक्षा जास्त घटल्या आहेत. आगामी महिन्यात ही घसरण आणखी वाढू शकते. मात्र वर्ल्ड गोल्ड काैन्सिल आणि कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, २०२३च्या शेवटी पुन्हा सोन्याच्या किमती वाढू शकतात. २ फेब्रुवारी रोजी ५८,८८२ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. २८ फेब्रुवारीपर्यंत हे ३,३३२ रुपये (५.६६%) घटून ५५,५५० रुपये प्रति १० ग्रॅम राहिले. डब्ल्यूजीसीच्या मते, व्याजदरात वाढीचा क्रम संपेपर्यंत सोन्यात घसरण सुरू राहू शकते. मात्र २०२३च्या शेवटपर्यंत २०२४च्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेसह जगभरातील केंद्रीय बँका दर कमी करणे सुरू करू शकतात. त्यानंतर सोन्यात तेजी येऊ शकते.
डॉलर मजबूत होईल, सोने कमजोर होत राहील एंजिल वनच्या एव्हीपी प्रथमेश मल्ल्यांनी सांगितले, ‘अमेरिकेत व्याजदर वाढल्याने डॉलर मजबूत होईल. यामुळे सोन्याच्या किमती खाली येऊ शकतात. डब्ल्यूजीसीच्या मते, महागाई आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकां या वर्षी सोन्याचे भाव ठरवण्यात भूमिका बजावतील.
अमेरिकेत महागाई कमी झाल्यास सोने वाढू शकते कोटक सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, अमेरिकी अर्थव्यवस्था मजबूत होण्याची चिन्हे आहेत. तेथील दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. मात्र थोडी मंदी आणि कॉर्पोरेट कमाईतील घट सोन्यासाठी सकारात्मक आहे. महागाई कमी झाल्यामुळे डॉलर कमकुवत होईल आणि सोने महाग होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.