आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये सोन्याला झळाळी:सोने पुन्हा 50 हजार पार, या वर्षी सहा महिन्यांतच 22% रिटर्न

अजय कुलकर्णी | औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोन्याची किंमत 2000 मध्ये 4380, आता 50 हजारांवर

जगभरात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास विलंब लागण्याच्या शक्यतेने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले. राज्यातही मंगळवारी सोने झळाळले असून किमती दहा ग्रॅमला ५० हजारांच्या पार पोहोचल्या आहेत. गेल्या २० वर्षांत सोन्याने १०९ टक्के परतावा दिला आहे. २००० मध्ये सोने ४३८० रुपयांवर होते. यंदा सहा महिन्यांत सोन्याने २१.५० टक्के परतावा दिला आहे.

सोने किमतीवर परिणाम करणारे घटक

जागतिक घडामोडी

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. जगात कोठेही कोपऱ्यात दोन देशांत तणाव निर्माण झाल्यास सोन्याच्या किमती वाढतात.

नैसर्गिक आपत्ती

जगात कोठेही सुनामी, महापूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आल्या व त्यामुळे नुकसान झाल्यास सोने वर-खाली होते.

रुपयाचे अवमूल्यन

विदेशी चलनाच्या तुलनेत रुपयात लक्षणीय घसरण झाल्यास सोने तेजीत येते. डॉलरच्या तुलनेत सध्या रुपया ७४.६६ या पातळीत आहे.

कच्चे तेल

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास सोने वधारते. कच्चे तेल पिंपामागे ४२ ते ४३ डॉलर आहे. हे दर ८० डॉलर वर गेल्यास सोने महागते.

अमेरिकेचे धोरण 

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने एखादे पॅकेज जाहीर केल्यास बाजारात तेजी येते. लोक पैसा शेअर बाजारात वळवतात, सोने महागते.

मुहूर्त, लग्नसराई 

लग्नसराई, दसरा, पाडवा, अक्षय्य तृतीया या मुहूर्ताला मागणी येते परिणामी सोने महागते.

‘बाय ऑन डीप’ पद्धतीने खरेदी करावी

कोविडची परिस्थिती, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे सध्या सोन्याचे दर वाढत आहेत. सामान्य ग्राहकांनी डिमॅटच्या माध्यमातून दर महिन्याला थोडे थोडे सोने खरेदी करावे. दीर्घावधीसाठी आणि ‘बाय ऑन डीप’ ह्या तंत्राचा वापर करावा, म्हणजे एकदम खरेदी न करता भाव उतरतील त्यावेळी खरेदी असे धोरण ठेवावे. यामुळे फायदा मिळू शकेल. विश्वनाथ बोदडे, गुंतवणूक सल्लागार

बातम्या आणखी आहेत...