आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण तेजी:सोने 53611 रुपयांवर, गेल्या 27 महिन्यांतील सर्वाधिक दर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोने पुन्हा एकदा १० ग्रॅमसाठी ५३६०० रुपयांच्या वर गेले आहे. हे सुमारे २७ महिन्यातील सोन्याचे सर्वाधिक दर आहेत. याआधी १८ ऑगस्ट २०२० रोजी सोने ५३८१५ रुपयांपर्यंत गेले होते. डॉलरमध्ये घसरणीमुळे जगभरात सोन्याचे दर वाढले आहेत. याचा भारतीय बाजारातही परिणाम दिसून येत आहे. तज्ज्ञांनुसार २०२३ मध्येही सोन्यात तेजी राहू शकते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) नुसार, शुक्रवारी सोन्याची (२४ कॅरेट) किंमत दहा ग्रॅमसाठी ५३६११ रुपये झाली. अवघ्या दोन दिवसांत सोने ८६० रुपये आणि गेल्या १० दिवसांत १२६१ रुपये महागले. २३ नोव्हेंबरला सोने ५२३५० रुपये दहा ग्रॅम होते. २०२२ मध्ये याआधी फक्त एकदा १८ एप्रिलला सोने ५३६०० च्या वर ५३६०३ पर्यंत गेले होते. आयबीजेए देशातील १३ मोठ्या शहरांत सोन्याचे सरासरी दर सांगते.

या तीन मोठ्या कारणांमुळे सोन्यात तेजी 1. डॉलरमध्ये घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घेण्यासाठी जास्त डॉलर द्यावे लागत आहेत. 2. चीनमध्ये २२ जानेवारीपासून नववर्षाचा जल्लोष सुरू होईल, या काळात तेथे सर्वाधिक सोने खरेदी होते. 3. स्थानिक चलनाला आधारासाठी भारत– चीनसह जगभरातील केंद्रीय बँक सतत सोने घेत आहेत.

जेरोम पाॅवेल यांच्या वक्तव्यानंतर तेजी अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी बुधवारी म्हटले होते की, डिसेंबर आणि त्यानंतर व्याजदरात वाढ केली जाईल. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, यामुळे डॉलरमध्ये घसरण सुरू झाली. डॉलर घसरल्यावर सोन्यात तेजी येते. सध्या तेच होत आहे. ओरिगो कमोडिटीजचे वरिष्ठ व्यवस्थापक (कमोडिटी रिसर्च) इंद्रजित पॉल यांनी सांगितले, आगामी आठवड्यात सोन्यात तेजी राहू शकते.

पुढील वर्षी ६१००० पर्यंत जाऊ शकते सोने केडियांनी सांगितले, २२ जानेवारीपासून चीनमध्ये नववर्षाचा जल्लोष सुरू होताेय. १५ दिवस चालणाऱ्या या उत्सवात सोन्याची खरेदी होते. जगभरातील मध्यवर्ती बँकाही सतत सोने खरेदी करत आहेत. यामुळे सोन्यात तेजी राहण्याची पूर्ण शक्यता आहे. ते म्हणाले, सोन्यासारख्या कमोडिटीत तेजी दीर्घकाळ राहते. सध्या त्याची सुरुवात आहे. पुढील वर्षी दहा ग्रॅम सोने ६०-६१ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

१० दिवसांआधी ५२,३५० रुपये होती सोन्याची किमत तारीख किंमत 23 नोव्हेंबर 52,350 24 नोव्हेंबर 52,729 25 नोव्हेंबर 52,662 28 नोव्हेंबर 52,673 29 नोव्हेंबर 52,715 30 नोव्हेंबर 52,751 01 डिसेंबर 53,120 02 डिसेंबर 53,611

बातम्या आणखी आहेत...