आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॉप परफॉर्मर 2011-20:150% जास्त रिटर्नसह दशकात सोन्याची बाजी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेन्सेक्स 132% परताव्यासह साेन्यानंतर क्रमांक दोनवर राहिले

जानेवारी २०११ पासून डिसेंबर २०२० चे आकडे पाहिल्यास सोने परताव्याच्या बाबतीत सेन्सेक्स आणि चांदी दोन्हींपेक्षा वरचढ ठरले आहे. सोन्याने या दशकात दीडशे टक्क्यांहून जास्त परतावा दिला आहे. दुसरीकडे, सेन्सेक्सचा परतावा या दशकात १३२ टक्के राहिला. चांदी ५६.०४ टक्के परताव्यासह तिसऱ्या क्रमांकावर राहिली. मात्र, हा आकडा जेवढा सरळ दिसतो तेवढा सरळ नाही. दशकाचा वेगवेगळा कालावधी पाहिल्यास शेअर बाजार सर्वाधिक परफॉर्मर राहिलेला आहे. या पूर्ण दशकात केवळ एक वर्ष असे होते, ज्यात बाजार पूर्णपणे घसरणीच्या टप्प्यातून गेला. फेब्रुवारी २०१५ पासून फेब्रुवारी २०१६ दरम्यान हा टप्पा आला. या काळात सेन्सेक्स २९,००० अंकांनी पडून २३,४०० पर्यंतच्या पातळीपर्यंत आला होता. याशिवाय बाजार एका निश्चित दराने वाढत राहिला. याउलट सोन्याकडे पाहिल्यास याने २०११ मध्ये चांगली वृद्धी घेतली, मात्र यानंतर जानेवारी २०१२ पासून जून २०१७ पर्यंत २८,०००च्या आसपास घोंगावत राहिले. म्हणजे साडेपाच वर्षांपर्यंत याने गुंतवणूकदारांना कोणताही परतावा दिला नाही. सोन्यात पुन्हा तेजी डिसेंबर २०१९ पासून यायला सुरुवात झाली आणि नवी ऐतिहासिक उंची प्राप्त केली. चांदीची कहाणी सोने आणि सेन्सेक्स दोन्हींपेक्षा वेगळी आहे.

या दशकाची सुरुवात चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी एका स्वप्नाप्रमाणे राहिली. जानेवारी २०११ मध्ये ४३,६४० रु. किलो विकली जाणारी चांदी पुढील तीन महिन्यांत एप्रिल २०११ मध्ये ७० हजार रुपयांच्या ऐतिहासिक उंचीवर पोहोचली. मात्र, यानंतर डिसेंबर २०१५ येता-येता चांदीचे भाव निम्म्यापेक्षा अधिक घसरून ३५ हजार रुपये प्रतिकिलोच्या जवळपास राहिले. हळूहळू वाढत चांदी जानेवारी २०२० मध्ये ४७ हजारांच्या जवळपास पोहोचली, मार्चमध्ये ही घसरून ३९,००० वर आली. एप्रिल २०२० मध्ये यामध्ये पुन्हा तेजी दिसली.

सोने प्रतिकिलो 10 ग्रॅम, चांदी प्रतिकिलो
दीर्घकाळाचा विचार केल्यास सोने नेहमी सुरक्षित आणि जास्त परतावा देते. २० वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास सांगतो की, या अवधीत सोन्याने ११०० टक्क्यांहून जास्तीचा परतावा दिला. यादरम्यान इक्विटीने ७२० टक्क्यांचा परतावा दिला. -अजय केडिया, एमडी, केडिया अॅडव्हायझरी

बातम्या आणखी आहेत...