आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:जागतिक मागणी वाढल्याने एप्रिलअखेरीस 49,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते सोने

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनने बँकांना मोठ्या प्रमाणात सोने आयातीस परवानगी दिली

एप्रिलच्या सुरुवातीस देशातील बाजारात सोन्याचा भाव ४५,००० रुपयांखाली आल्यानंतर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. या महिन्यात आतापर्यंत सोने पाच टक्के महाग झाले आणि एप्रिलअखेरीस हे पुन्हा एकदा ४९,००० रु. प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोन्याचा सर्वात जास्त वापर करणारा देश चीनने याबाबत आक्रमक धोरण अंगीकारले आहे. तेथील सरकारने देशातील आणि आंतरराष्ट्रीय बँकांना चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करण्यास परवानगी दिली आहे. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, यामुळे जागतिक सोन्याच्या बाजाराची धारणा सुधारेल, याचा परिणाम भारतीय बाजारावरही होईल. देशातील बाजारात सोन्याची आधीपासूनच झळाळी दिसत आहे. १ एप्रिल रोजी सोने ४४,८०० प्रति १० ग्रॅमवर होते आणि तेव्हापासून ५ टक्क्यांची तेजी आली आहे.

सोन्याची झळाळी वाढण्याची तीन कारणे
- चीनच्या आक्रमक धोरणामुळे सोन्याच्या बाजाराची धारणा सुधारणा शक्य.
- अमेरिकेत यूएस ट्रेझरी यील्ड घटल्याने सोन्यात गुंतवणूक वाढली.
- देशात कोविडच्या वाढत्या रुग्णांमुळे अर्थव्यवस्थेची सुधारणा मंदावण्याची शक्यता.

तेजी सुरू राहण्याची शक्यता
आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्यानुसार, २ महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,८५० डॉलर प्रति औंस आणि देशातील बाजारात ४९,००० रु. प्रति १० ग्रॅम पातळी स्पर्श करू शकते. मेअखेर सोने ५०,००० पर्यंत पोहोचू शकते.

चीनच्या धोरणाने सोने बाजाराला बळ
अजय केडिया म्हणाले, सोने आयातीबाबत चीनच्या आक्रमक धोरणामुळे ग्लोबल गोल्ड मार्केटच्या धारणेत सुधारणा होईल. त्यांचे सरकार खरेदीच्या पद्धतीतही बदल करेल, कारण आता ते हाँगकाँगच्या माध्यमातून नव्हे तर थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून सोने खरेदी करेल. , हाँगकाँगसोबत त्यांचा तणाव वाढला आहे. अशा स्थितीत सोन्याला अतिरिक्त सपोर्ट मिळेल.

१ एप्रिल रोजी साेने ४४,८०० रु. प्रति १० ग्रॅमवर होते
चीनच्या बँकांना सोने आयातीची सूट दिल्याने धारणा सुधारेल. याचा परिणाम भारतात होईल. -अजय केडिया, केडिया अॅडव्हायझरी

बातम्या आणखी आहेत...