आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतात या वर्षी साेन्याचा वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के कमी हाेऊ शकताे. असे झाले तर गेल्या तीन दशकातील ही सर्वात कमी नीचांकी पातळीवरील विक्री असू शकेल. काेराेना विषाणू महामारी अाणि देशभरातील लाॅकडाऊन हे यामागचे माेठे कारण अाहे. लाॅकडाऊनमध्ये साेशल डिस्टन्सिंगमुळे अनेक सण अाणि विवाहामध्ये साेने खरेदीवर परिणाम हाेत अाहे. भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे आणि ही मागणी कमी झाल्यास यामुळे सोन्याच्या जागतिक किमतीतही घसरण येण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीस जागतिक सोन्याची किंमत सात वर्षाच्या उच्च पातळीवर पोहोचली होती. मात्र, मागणीत घट आल्याने एक सकारात्मक पैलू असाही आहे की, देशाची व्यापारी तूट कमी होईल आणि रुपयाला बळकटी मिळेल.ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी काउंसिलचे चेअरमन एन. अनंत पद्मनाभन म्हणाले, आम्ही सोन्याच्या मागणीत अशा पद्धतीची घसरण याआधी पाहिली नाही.
लग्न मुहूर्त लांबल्याचा वाईट परिणाम
पद्मनाभन म्हणाले, उन्हाळा हा विवाहांचा हंगाम असताे. पण या वेळी काेराेना व्हायरस अाणि लाकडाऊनमुळे माेठ्या प्रमाणावर लग्न लांबणीवर टाकण्यात येत अाहेत. जे विवाह हाेत अाहेत त्यात साेने खरेदीचे प्रमाण खूप कमी असून हा दागिने उद्याेगासाठी माेठा धक्का अाहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत परिस्थिती सर्वसामान्य हाेऊ शकते अाणि तेव्हा मागणीत सुधारणा हाेण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच गुढीपाडव्याला या वेळीदेखील साेने खरेदी जवळपास नाही. एप्रिलमध्ये ही घट २५ हजार काेटी रुपयांची हाेऊ शकते असे अन्य एका अहवालामध्ये म्हटले अाहे.
उद्याेगांची मागणी - अायात शुल्क कमी करा
साेन्यावर जास्त अायात शुल्क असल्याने व्यावसायिक उत्पादन शेजारच्या देशात स्थलांतरित करीत असल्याचे उद्याेग क्षेत्राचे म्हणणे अाहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पाेर्टनने हे शुल्क ४ % करण्याची मागणी केली अाहे.
उद्याेगावर बेराेजगारीची टांगती तलवार
कोरोना व्हायरसच्या अाधी देशाच्या अर्थव्यवस्थेची मंदीच्या मार्गाने वाटचाल सुरू हाेती. महामारीमुळे असंघटित क्षेत्रावर माेठ्या प्रमाणावर बेराेजगारीची टांगती तलवार अाहे. अनेक क्षेत्रात पगार कपात सुरू झाली अाहे. त्याचा परिणाम दागिने उद्याेगावर हाेणार अाहे. पद्मनाभन म्हणाले, अतिरिक्त उत्पन्न असणारे सोने खरेदी करतात. सध्या अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता खूप कमी अाहे. भविष्यातील अनिश्चिततेमुळे लाेक बचत करत अाहेत. त्यामुळे हिरे व दागिने क्षेत्रात नकारात्मक परिणाम हाेणे निश्चित अाहे.
२०१९-२० मध्ये अायातीत १४ % घट
२०१९-२० मध्ये देशातील साेन्याची अायात १४.२३ % घटून २,८२० काेटी डाॅलरवर (अंदाजे २.१ लाख काेटी रु.) अाली. २०१८-१९ मध्ये ३,२९१ काेटी डाॅलरची (२.५३ लाख काेटी रु) साेने अायात झाली. साेन्याची अायात कमी झाल्याने व्यापारी तूट कमी हाेण्यास मदत झाली अाहे. २०१९-२० मध्ये व्यापार तूट १५,२८८ काेटी डाॅलर (११.७५ लाख काेटी रु.) झाली. २०१८-१९ मध्ये १८,४०० काेटी डाॅलर (अंदाजे १४.१४ लाख काेटी रुपये) झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.