आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया आठवड्यात सोने- चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्यात सराफा बाजारात सोने 15 रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि शनिवारी 51,638 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.
दुसरीकडे, या आठवड्यात चांदीच्या दरात 800 रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तो 67,782 रुपये होता जो शनिवारी कमी होऊन 66,889 रुपये प्रति किलो झाला आहे. म्हणजेच या आठवड्यात त्याची किंमत 893 रुपयांनी कमी झाली आहे.
कॅरेट च्या तुलनेत सोन्याची किंमत
कॅरेट | भाव(रुपये 10 ग्रॅम) |
24 | 51,638 |
23 | 51,431 |
22 | 47,300 |
18 | 38,729 |
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर येथेही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 12 डॉलर प्रति औंसने घसरून 1924 डॉलर प्रति औंसची पातळी गाठली.
चांदी-सोन्याच्या दरात का होते आहे घसरण?
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रशियाकडेही सोन्याचा मोठा साठा असून तो जागतिक बाजारपेठेत विकायचा आहे. हे सोने बाजारात आल्यास त्याचा पुरवठा वाढेल आणि भावात मोठी घसरण होऊ शकते. मात्र, तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात फारशी घसरण होण्याची शक्यता नाही.
आता मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर शोधा
सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. येथे तुम्ही नवीन दर तपासू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.