आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Gold ; Gold Price Today ; Gold MCX ; Before Akshaya Tritiya, Gold Again Crossed 48 Thousand, Silver Reached 72 Thousand; News And Live Updates

सोन्याच्या खरेदीत करू नका उशीर:अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याने पुन्हा 48 हजारांचा टप्पा पार केला, चांदीही 72 हजारांवर पोहोचली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2025 पर्यंत सोने 10 पटीने महाग होण्याची शक्यता

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून आज पुन्हा एकदा सोने 48 हजारांच्या पुढे गेले आहे. सोमवारी दुपारी 11.20 मिनटांनी MCX वर सोन्याचे भाव 48,043 रुपयावर होते. तर दुसरीकडे सरफाचा विचार केल्यास इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार सोने 47,854 वर पोहोचले आहे. तर चांदीमध्ये 530 रुपयांनी वाढ होत 71,967 रुपये प्रति किलो झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस सोने 60 हजारांपर्यंत जात असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.

2025 पर्यंत सोने 10 पटीने महाग होण्याची शक्यता
तज्ञांच्या मते, जर डॉलरच्या दरात अशीच घट होत राहिली तर सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. सोन्याला 1971 मध्ये चलनातून बाद करण्यात आले. त्यानंतर त्यामध्ये सतत वाढ होत असून 1980 मध्ये सोन्याच्या किंमतीत 2000% वाढ झाली होती.

सोन्याची ही पहिली बुल बाजारपेठ असल्याचे सांगितले जाते. 1999 ते 2011 पर्यंत चाललेल्या दुसर्‍या बुल बाजारात सोन्याच्या भावात 670% वाढ झाली होती. विशेष म्हणजे यामध्ये सतत वाढ होत आली आहे. त्यामुळे 2025 पर्यंत सोन्याचे भाव 10 पटीने वाढतील असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

सोने का महाग होत आहे?

  • कोरोनामुळे जगभरात अनिश्चिततेचे वातावरण असून यामुळे शेअर बाजारात अधिक चढ-उतार होत आहे. असा विश्वास आहे की, या काळात गुंतवणूकदार स्टॉकमधील पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करतात. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढू लागतात.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे दर कमकुवत होत असून डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर झाला आहे, त्यामुळे सोन्याला आधार मिळत आहे.
  • चीनमध्ये बँकांना सोने आयात करण्याची मान्यता मिळाल्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीत तेजी दिसून येईल.
  • आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत. सोन्याची किंमत प्रति औंस 1,835 अमेरिकन डॉलर्स पार झाली आहे. यापूर्वी 1 एप्रिल रोजी सोने 1,730 अमेरिकन डॉलर्स होते.
  • किरकोळ आणि घाऊक चलनवाढीचा आकडाही 8 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ज्यामुळे सोन्या-चांदीला आधार मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...