आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सोन्याचा नवीन रेकॉर्ड:सोन्याच्या किमतीने गाठला 50 हजार रुपयांचाया नवीन उच्चांक, चांदीही 60 हजारांच्या पुढे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी मार्चमध्ये सोन्याची किंमत 38,500 रुपयांवर आली होती

कोरोना महामारीदरम्यान सोन्याने उच्चांक गाठला आहे. बुधवारी प्रती 10 ग्राम सोन्याची किंमत 50,021 रुपये झाली. दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सप्टेंबरमध्ये डिलीव्हर होणाऱ्या चांदीचे किमतीनेही सात वर्षातील उच्चांक गाठला आहे. चांदीची किंमत 60,782 प्रती किलो झाली आहे.

यूरोपीय संघातील नेत्यांनी कोरोनामुळे झालेल्या आर्थिक संकटातून वर येण्यासाठी 750 बिलियन यूरोंचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे. अमेरिकाही एक ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजवर काम करत आहे.

सोन्याच्या किमतीत 30% उसळी

यावर्षी मार्चमध्ये सोन्याची किंमत 38,500 रुपये प्रती 10 ग्रामवर पोहचली होती. या हिशोबाने एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीने 30 टक्के उसळी मारली आहे. दुसरीकडे, मार्चमध्ये चांदीची किंमतीत 81 टक्के घट होऊन 33,580 रुपये प्रती किलोवर आली होती. यापूर्वी 2011 मध्ये चांदीची किंमत 73,600 रुपये प्रती किलोवर पोहचली होती.

सोन्याचा भाव 1965 च्या तुलनेत आतापर्यंत 746 पट वाढला

भारतात सोन्याचा भाव 1965 च्या तुलनेत आता 746 पट वाढला आहे. कोरोना संक्रमणानंतर जगभरात सोन्याची मागणी वाढली आहे. यापुढे तीन ते पाच वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

80 हजार रुपये प्रती 10 ग्रामवर जाऊ शकते किंमत

जगभरात पसरलेल्या कोरोना संक्रमणामुळे शेअर बाजार आणि बॉन्डमध्ये कमतरता आलेली दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता, गुंतवणूकदारांनी सोन्याच्या गुंतवणुकीकडे भर दिला आहे. यामुळे सोन्याच्या किमतीत उच्चांक पाहायला मिळत आहे. यादरम्यान बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज (BofA Sec) च्या एनालिस्टने अंदाज व्यक्त केला आहे की, 2021 च्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रती औंसपर्यंत जाऊ शकते. 3000 डॉलरला भारतीय रुपयात कन्वर्ट केल्यावर 2,28,855 रुपये होतात.