आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Gold Imports | Due To The Lockdown, Imports Fell By 99.9% In April, The Lowest Monthly Import In 30 Years

साेने आयात:लाॅकडाऊनमुळे एप्रिलमध्ये साेने आयातीत ९९.९% घट, ३० वर्षांतील सर्वाधिक कमी मासिक आयात

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • गेल्या महिन्यात झाली ५० किलाे साेने आयात, एप्रिल २०१९मध्ये ११०.१८ टन झाली साेने आयात
  • कोरोना विषाणू महारोगराई पसरल्यामुळे जगात आयात-निर्यातीवर झाला परिणाम

एप्रिलमध्ये देशातील साेन्याच्या आयातीमध्ये ९९.९ % घट झाली आहे. गेल्या ३० वर्षांत साेन्यामध्ये इतक्या माेठ्या प्रमाणावर घट हाेण्याची ही पहिलीच वेळ आहे. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे ठप्प झालेला विमान प्रवास व दागिन्यांची दुकाने बंद असल्याने ही घसरण प्रामुख्याने झालेली आहे. भारतात साेन्याची आयात ही प्रामुख्याने हवाई मार्गाने हाेते. परंतु, लाॅकडाऊनमुळे देशभरातील व्यावसायिक विमान सेवांवर निर्बंध घातले आहेत.

साेन्याचा वापर हाेणारा भारत हा चीननंतरचा दुसरा सर्वात माेठा देश आहे. परंतु, एप्रिल २०२०च्या दरम्यान देशात केवळ ५० किलाे साेने आयात हाेऊ शकली. गेल्या वर्षात याच महिन्यात ११०.१८ टन साेने आयात झाली हाेती. मूल्य स्वरूपात साेने आयात घटून २८.४ लाख डॉलरवर आली आहे. गेल्या वर्षात याच महिन्यात ३९७ काेटी डाॅलरच्या साेन्याची देशात आयात झाली हाेती. आर्थिक मंत्रालयात या आकडेवारीशी निगडीत सूत्रांनी ही माहिती दिली.दागिने उद्याेगाची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात दर वर्षी ८०० - ९०० टन साेन्याची आयात हाेते. परंतु, काेराेना महामारीच्या प्रकाेपामुळे २०१९-२० या विद्यमान आर्थिक वर्षामध्ये साेने आयात ५६ % वरून घसरून ६१ % वर म्हणजे ३५० टन हाेऊ शकते, असे मत बुलियन तज्ञांनी व्यक्त केले आहे. आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डाेमेस्टिक काैन्सिलचे अध्यक्ष एन. पद्मनाभन म्हणाले, एप्रिलमध्ये साेन्याची आयात जवळपास नाही. देशात बहुतांश साेने विमानाद्वारे आणले जाते.

मुंबईत साेने १७० रु., चांदी ५९० रुपयांनी स्वस्त

मुंबईत मंगळवारी साेने १७० रुपये आणि चांदी ५९० रुपयांनी स्वस्त झाली. ९९.५ कॅरेट प्रतिग्रॅम स्टँडर्ड साेन्याची किंमत ४५,५६० रुपये झाली. ९९.९ कॅरेटच्या १० ग्रॅम शुद्ध साेन्याची किंमत ४५,७४३ रुपये झाली. त्याच प्रमाणे चांदी किलाे मागे ४०,७१० रुपयांनी विकली. साेमवारी ९९.५ कॅरेटच्या स्टँडर्ड साेन्याची किंमत ४५,७२९ रुपये आहे.

आयात शुल्क घटवून ४ % करा : आयातदारांची मागणी

सरकारने सोन्याच्या आयातीवरील शुल्क १० % वरून वाढवून १२.५ % केले हाेते. आयात शुल्क जास्त असल्याने दागिने उत्पादक शेजारच्या राज्यात आपले उत्पादन स्थलांतरीत करत आहेत. त्यामुळे आयात शुल्कात ४ % कपात करण्याची उद्याेगाची मागणी आहे.रत्न व दागिन्यांची निर्यात २०१९-२० मध्ये ११ टक्क्यांनी घटून ३,५८० काेटी डाॅलरवर आली आहे.

साेने आयातीत तीन ते चार महिने तेजीची शक्यता नाही

लंडनच्या मेटल फाेकस कंपनीचे सल्लागार चिराग सेठ म्हणाले, साेन्यामध्ये कमीत कमी ३-५ महिने तेजी येण्याची शक्यता नाही. कामगारांच्या अनुपलब्धतेमुळे दागिने उत्पादनावरही निश्चित परिणाम हाेणार आहे. काेराेना संसर्ग राेखणे व टाळेबंदी यामुळे या क्षेत्रातील अनेक कुशल कामगार आपल्या गावी गेले आहेत.

साेने आयात घटल्यास व्यापारी तूट कमी होईल

वित्त वर्ष २०१९-२० मध्ये देशात साेन्याची आयात १४.२३ % घसरून २,८२० काेटी डाॅलर झाली. वर्ष २०१८-१९मध्ये ती ३ टक्क्यांनी कमी हाेऊन ३.२९१ काेटी डाॅलरवर आली. साेन्याची आयात घटल्यास देशाची व्यापार तूट कमी हाेण्यास मदत मिळते. नुकत्याच संपलेल्या २०१९-२० आर्थिक वर्षात व्यापार तूट १६.९१%नी कमी हाेऊन १५,२८८ काेटी डॉलरवर आली. त्या आधीच्या २०१८-१९मध्ये ती १८,४०० काेटी डाॅलर हाेती.

जुलै-सप्टेंबमध्ये चालू खात्यातील तूट जीडीपीच्या तुलनेत ०.९ टक्के (६३० कोटी डॉलर)समान राहिली. २०१८ मध्ये याच कालावधीत ती जीडीपीच्या तुलनेत २.९ टक्के(१,९०० काेटी डाॅलर) हाेती.

बातम्या आणखी आहेत...