आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी परतली:सोन्याच्या आयातीत साडेसात पट वाढ, कोविडपूर्व पातळीपेक्षा 250% जास्त

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वस्त किंमत आणि सणासुदीत मागणी आणखी वाढण्याची शक्यता

सणासुदीच्या वातावरणामुळे देशात सोन्याला पुन्हा एकदा मागणी आली आहे. गेल्या महिन्यात देशात ९१ टक्के सोन्याची आयात झाली. ही सप्टेंबर २०२० च्या तुलनेत ६५८ % आणि काेविड महामारी सुरू हाेण्याच्या आधी म्हणजे २०१९ च्या तुलनेत २५० % जास्त आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी झालेल्या सोन्याच्या किमती आणि या वर्षी सणासुदीमध्ये चांगल्या मागणीची शक्यता यामुळे सोन्याच्या आयातीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फक्त १२ टन सोन्याची आयात झाली हाेती. काेराेना संसर्गाची लाट त्यावेळी उच्च पातळीवर असणे हे त्याचे माेठे कारण आहे. त्या आधी म्हणजे सप्टेंबर २०१९ मध्ये फक्त २६ % साेने आयात झाली हाेती. त्यावेळी किमती २६ टक्क्यांनी वाढल्याने मागणी कमी झाली हाेती. परंतु या वर्षी सप्टेंबरमध्ये साेन्याची आयात वाढून ९१ टक्के झाली. या वर्षी सप्टेंबरमध्ये ३७.८९८ काेटी रुपयांची साेन्याची आयात झाली.

आॅक्टाेबरमध्ये आयात आणखी वाढण्याची शक्यता, किमती वाढू शकतात
साेन्याची आयात वाढण्याचा कल आॅक्टाेबरपर्यंत कायम राहू शकताे. या महिन्यात दसरा, दिवाळी अक्षय्य तृतीया आहे. देखील आहे. या महिन्यात साेन्याची जास्त आयात हाेण्याची शक्यता आहे. वाढत्या मागणीबराेबर किमतीही वाढण्याची शक्यता असल्याचे केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले.

या वर्षात आतापर्यंत २,७५० रुपयांनी कमी झाल्या साेन्याच्या किमती
यावर्षी आतापर्यंत १० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे २,७५० रुपयांनी कमी झाली आहे. जानेवारी महिन्यात दागिन्यांच्या साेन्याच्या किमत ४५,२५० रुपये प्रति १० ग्रॅम होती. हीच किंमत या महिन्यात सुमारे ४२,५०० रुपयांवर आली आहे.

आयातीत वाढ हाेण्याची चार मुख्य कारणे
- लाे- बेस म्हणजे सप्टेंबर २०२० मध्ये खूप कमी सोने आयात हाेणे
- साेन्याच्या किमती जवळपास ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर येणे
- सणासुदीमुळे सप्टेंबर- आॅक्टाेबरला जास्त मागणी असते
- सणांनंतर लग्नासाठी सोन्याची खरेदी वाढते.

बातम्या आणखी आहेत...