आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय भूवैज्ञानिक पाहणीत देशातील १५ ठिकाणी सोन्याचे भांडार असल्याचे संकेत मिळाले आहेत. वर्षअखेरीस या भागाचा अहवाल तयार होणार आहे. त्याबरोबरच उत्खननाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. २०१५ च्या पाहणीनुसार देशात २५ टक्के सोने एकट्या राजस्थानात असू शकते. उदयपूरचे देवगाव, बांसवाडाच्या घटियानाच्या भूगर्भात सोन्याच्या शोधासाठी पाहणी केली जात आहे. उदयपूरच्या खोरी महुरी व बांसवाडाच्या उत्तर जगपुरामध्ये दुसऱ्या पातळीवरील पाहणी करण्यात आली आहे. पाहणीच्या अहवालात शुभसंकेत मिळाल्यानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने २०२१ मध्ये देशातील २२२ ठिकाणांच्या पाहणीला सुरुवात केली आहे. बिहारच्या नक्षलग्रस्त जिल्हा जमुईमध्ये देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही संसदेत एका प्रश्नावरील उत्तरात ही माहिती दिली.
बिहारमध्ये सोन्याचे भांडार एकूण ४४ टक्के असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. देशात हे प्रमाण सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. राजस्थानात २४ टक्के सोने असावे. देशात एकूण ५०१. ८३ टन सोन्याचे भांडार आहे.छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, लक्षद्वीप, राजस्थानात सोन्यासाठी पाहणी झाली. तर छत्तीसगडचे रायगड, मध्य प्रदेशातील बरायथा, ओडिशातील पद्मपूर-पाइकमल-झारबंध व आंध्रातील कनागनपल्ले-धर्मावरम येथे हिऱ्याचे भांडार सापडले आहे.
देशात तीन वर्षांत केलेले उत्खनन
धातू 2019 2020 2021 हिरा 38,437 28,816 13,917 सोन्याचे दगड 5,65,653 5,91,231 4,50,611 सोने 1,164 1,724 1,126
नोट : हिरा कॅरेटमध्ये, सोन्याचे दगड टन व सोने किग्रॅमध्ये
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.