आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवीन ट्रेंड:सोन्याच्या विक्रमी तेजीमध्ये बँकांत सुवर्ण कर्जाची स्पर्धा, 112 लाख कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांवर आता नजर

स्वांसी अफॉन्सो, अंकिता विस्वास | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुथूट फायनान्स व मणप्पूरमकडे मिळून जगातील 23 वे सर्वात मोठे भांडार

कोरोना संकटात सुवर्ण कर्ज भारतीय कुटुंबांसाठी सर्वात मोठ्या मदतीच्या रूपात समोर आले आहे. लोक घरांतील दागिने तारण ठेवून सहज पैशाची तजवीज करू शकत आहेत. वित्तीय फर्म आणि बँकांनी मागणीतील तेजीचा फायदा उचलत सुवर्ण कर्जाची नवनवी उत्पादने लाँच करण्यास सुरुवात केली आहे. सोन्याच्या विक्रमी तेजीनेही लोकांना सुवर्ण कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. मुंबईच्या सराफा बाजारात गुरुवारी सोने ५३,०१५ रु. प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले. ही आतापर्यंतची सर्वात महाग पातळी आहे. यामुळे घरांत ठेवलेले कमी किमतीचे सोन्याचे दागिने तारण ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण, त्यांना आता सोन्याच्या किमती वाढण्यापेक्षा जास्त कर्ज मिळू शकत आहे. यामुळे बँकाही सुवर्ण कर्जाच्या ग्राहकांना आकर्षित करण्यात गुंतल्या आहेत. एचडीएफसी बँक लिमिटेड व फेडरल बँक लिमिटेडसारख्या फर्म सोने कर्जाचा विस्तार करत आहेत. एचडीएफसी बँक ग्रामीण भारतात शाखांची संख्या वाढवत आहे. कोरोनाकाळामुळे मणप्पुरम २४ तासांत बँक नेटवरद्वारे सोने कर्जाचा प्रस्ताव देत आहे.

७ ते १५ % व्याजाने बँका देताहेत सोने कर्ज :

सुवर्ण कर्ज सोन्याच्या मूल्याच्या ७५% पर्यंत मिळते. बँक जवळपास ७% ते १५% दर आणि मणप्पुरम व मुथूटसारख्या कंपन्या १२% ते २९% पर्यंत दराने व्याज वसूल करतात. सुवर्ण कर्ज घेणे एवढे सुलभ आहे की, अर्जाच्या एका तासात पैसे मिळतात.

केपीएमजीच्या अंदाजानुसार, दोन वर्षांत ३४% च्या वृद्धीने सुवर्ण कर्ज उद्योग ६१ अब्ज डॉलरचा होईल. जागतिक सुवर्ण परिषदेत भारताचे व्यवस्थापकीय संचालक पी.आर. सोमसुंदरम यांनी सांगितले की, बँकिंग क्षेत्रास या वित्तीय वर्षात झालेल्या नुकसानीच्या २०% ते २५% भरपाई करण्यात सुवर्ण कर्ज सक्षम आहे. त्यांनी सांगितले की, सुवर्ण कर्ज वाढत आहे, मात्र लॉकडाऊन पूर्ण संपल्यावर यात आणखी मोठी उसळी येईल.

सोने साठा: मुथूट फायनान्स आणि मणप्पुरमकडे 23वे सर्वात मोठे भांडार

सर्वात जास्त सोन्याचे भांडार अमेरिकेकडे आहे. सोन्याच्या भांडारात चीन सातवा तर भारत दहाव्या क्रमांकावर आहे. मुथूट फायनान्स व मणप्पूरमकडे मिळून जगातील २३ वे सर्वात मोठे भांडार आहे.

बँक , सुवर्ण कर्ज कंपन्यांचा सतत वाढतोय व्यवसाय

> एचडीएफसी बँक बाजारात प्रवेश करत आहे. विशेषत: ग्रामीण क्षेत्रात. या वर्षी ८०० पेक्षा जास्त सुवर्ण कर्ज घेणाऱ्या शाखा सुरू करण्याची योजना आहे.

> केरळमधील फेडरल बँकेच्या जून तिमाहीत सोने कर्जात ३६% वाढ.

> मुथूट आणि मणप्पुरमच्या शेअर्समध्ये लॉकडाऊपासूनच तेजी आहे. मुथूटच्या शेअर दुप्पट भावावर आहेत.

> मुथूट आणि मणप्पुरम दोन्हीच्या ग्राहकांद्वारे २४८.४ टन सोने तारण ठेवले आहे.