आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या साेन्याची विक्रमी वाटचाल सुरू आहे. पुढे साेने महाग हाेईल की स्वस्त, असे प्रश्न मनात येतात. याच प्रश्नांचा धांडाेळा घेण्यासाठी दैनिक भास्करने देश-विदेशातील तज्ज्ञांच्या मतांचे विश्लेषण केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साेन्याचे दर २२ टक्क्यांनी घसरू शकतात, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र, भारतातील बाजारपेठ विश्लेषकांनुसार देशात साेने ८-१० टक्क्यांनी महाग हाेऊ शकते. कॅपिटल इकाॅनाॅमिक्सच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठादार व्यवस्थेत सुधारणा हाेत आहे. गाेल्ड मायनिंगही वाढले आहे. अमेरिका-ब्रिटनमध्ये महागाई कमी हाेत चालली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार इक्विटीमध्ये पैसा गुंतवू लागले आहेत. त्यामुळे साेन्याच्या मागणीत घट हाेण्याचा अंदाज व्यक्त हाेताे.
जगभरातील २० पैकी १३ दिग्गज विश्लेषक म्हणाले, साेन्याचा भाव ५-२२ टक्क्यांपर्यंत कमी हाेण्याची शक्यता जगभरातील २० प्रमुख वित्तसंस्था व विश्लेषकांपैकी १३ जणांनी २०२३ मध्ये सोन्याचे भाव ५-२२ % घटतील, असे विश्लेषण मांडले. त्यात वर्ल्ड बँक, क्रेडिट सुइस व कॅपिटल इकॉनॉमिक्ससारख्या प्रमुख संस्था आहेत.
भाव घटण्याची कारणे...
1. ऑस्ट्रेलियात गाेल्ड मायनिंग ऑक्टाे.-डिसें.मध्ये १२% वाढले.
2. अमेरिका, युराेप, चीनमध्ये साेन्याच्या विक्रीत घट शक्य
3. महागाईत हळूहळू घट हाेतेय. {२० संस्थांमध्ये तीन संस्थांनुसार (बँक ऑफ अमेरिका, बीसीए, आयएनजी) भाव ५४ हजार ६८५ रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
भाववाढीची ही कारणे..
२० संस्थांपैकी ४ संस्थेनुसार (स्टँडर्ड चार्टर्ड, पियरे लॅसाेंडे, सॅक्साे बँक, राॅबर्ट कियाेसाकी) भाव दुपटीने वाढू शकतात.
1. मंदीच्या भीतीने सोन्याच्या मागणीत वाढ होऊ शकते.
2. महागाई २ वर्षांत घटू शकेल.
3. चीनकडून पुरवठा खंडित.
4. युक्रेन युद्धामुळे बाजार काेसळेल, मागणी वाढेल.
... अन् येथे भाव ६२ हजार रुपयांपर्यंत
केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले, साेने ६२ हजारांपर्यंत जाऊ शकते. कारण ग्रामीण भागांतून मागणीत वाढ हाेईल. १५ टक्के आयात शुल्कामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव घटण्याचा येथे फारसा परिणाम दिसणार नाही. रुपयाही कमकुवत झाल्याने साेन्यासाठी जास्त डाॅलर द्यावे लागतील.
सोन्याचा उच्चांक; मुंबईत ५७,३२२ रुपये, तर औरंगाबादेत विक्रमी ५८,१०० प्रति १० ग्रॅम दर
मुंबई | येथील सराफा बाजारात पहिल्यांदाच २४ कॅरेटचे शुद्ध सोने मंगळवारी ५७,३२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर गेले. २० जानेवारीला ते ५७ हजारांवर गेले होते. २ जानेवारीला ५५,१६३ रुपये भाव होता. म्हणजेच २३ दिवसांत सोने २१५९ रुपयांनी महागले. दागिन्यांचे सोनेही ५२,५४० रुपयांवर पोहोचले आहे. औरंगाबाद शहरातील बाजारपेठेत २४ कॅरेट सोने ५८,१०० रुपये, २२ कॅरेट ५३,४५० रुपये, तर चांदी ६८,६०० रुपये प्रतिकिलो होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.