आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Gold Price Update | By Diwali, Gold Price Will Go Up To Rs 82,000, A Good Opportunity For Investment?

नॉलेज रिपोर्ट:दिवाळीपर्यंत साेने जाणारथेट ८२ हजार रुपयांपर्यंत, गुंतवणुकीसाठी चांगली संधी?

प्रमोद कुमार | नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांत सोन्याने दिला 55% परतावा, गेल्या सहा महिन्यांतच 24% वाढ

गेल्या दोन वर्षांत सोने ५५% वधारले आहे. सुमारे १९०० टन सोने खरेदी करणारे देश भारत व चीनने कोरोनामुळे फेब्रुवारीपासून खरेदी केलेले नाही. तरीही सोने ५० हजार रु. प्रती १० ग्रॅमच्या आसपास पोहोचले आहे. तज्ञांच्या मते भाव आणखी वाढेल. इंडिया बुलियन व ज्वेलर्स असो.च्या संचालक तान्या रस्तोगी सांगतात, लोकांना सोने महाग वाटेल, मात्र सोने खरेदीची अजूनही चांगली वेळ आहे. दिवाळीपर्यंत भाव ८२ हजारांच्या पुढे जाऊ शकते. अॅडिशन इन्व्हेस्टमेंट रिसर्च कंपनीच्या अहवालातही हाच दावा करण्यात आला. त्यानुसार सोन्याचा भाव ८२ हजारांच्या वर गेल्यास आणखी वेगाने वाढ होईल. जगातील जवळपास सर्व देश सध्या सोने घेत आहेत. आयबीजेएनुसार, मंदी आल्यानंतर सोने महाग होते. या वेळी लोक सोने विकतील, असा अंदाज होता. मात्र असे झाले नाही. भारतीय घरांमध्ये २५ हजार टन सोने आहे. यातील ७०% ग्रामीण भागात आहे.

तारण सोने परत घेताहेत

> जर्मनीसारखे देश इतर देशांत तारण ठेवलेले सोने परत घेत आहेत. 

> मंदीमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. 

> सोन्याची किंमत डॉलरच्या मूल्यावर अवलंबून असते. डॉलरचे मूल्य कमी झाल्यास सोने वधारणे निश्चित आहे. 

> सध्या कोरोनामुळे सोने उत्पादन ठप्प आहे. तस्करीही नाही. यामुळे सोन्यात एकतर्फी तेजी आहे. > दोन वर्षांत सोन्याने दिला ५५% परतावा, गेल्या सहा महिन्यांतच २४% वाढ.

असे वाढत गेले सोने

जानेवारी- २०१८ : ३०,००० रुपये

जानेवारी- २०१९ : ३२,५०० रुपये

२ जानेवारी- २०२० : ३९,१०८ रुपये

२ मार्च-२०२० : ४२,०२२ रुपये

१५ एप्रिल -२०२० : ४६,५०० रुपये

४ जुलै-२०२० : ४९,५०० रुपये

(आयबीजेएच्या संचालक तान्या रस्तोगी आणि जेम्स अँड ज्वेलरी समिती दक्षिण गुजरातचे अध्यक्ष नैनेश पच्चीगर यांच्यानुसार)

बातम्या आणखी आहेत...