आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Gold Price Updates: Gold At 49,000 For The First Time Since January; Soon 50 Thousand Stage Possible; News And Live Updates

झळाळी परतली:जानेवारीनंतर प्रथमच सोने 49 हजारांवर; लवकरच 50 हजारांचा टप्पा शक्य; आंतरराष्ट्रीय परिस्थिती पुन्हा पिवळ्या धातूला अनुकूल

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1900 डॉलर प्रति औंस पार

गेल्या काही महिन्यांपासून घसरणीचा सामना करणाऱ्या सोन्यात पुन्हा एकदा तेजी परतताना दिसत आहे. बुधवारी सोन्याची किंमत पुन्हा एकदा ४९ हजार रु. प्रति १० ग्रॅमवर गेली. याआधी शेवटी २९ जानेवारीला सोन्याचा भाव ४९ हजारांवर होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय परिस्थिती पुन्हा पिवळ्या धातूसाठी अनुकूल आहे. यामध्ये पुढेही तेजी राहील. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनमध्ये बुधवारी २४ कॅरेट सोने ४९,१९५ रु. प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. एक दिवस आधी हे ४८,६६४ रुपयांवर बंद झाले होते.

एमसीएक्समध्येही जून महिन्यात डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत ४९,०९६ रु. झाली. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष(कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, डॉलर इंडेक्स आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत जवळपास साडेचार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवसाय करत आहे. अमेरिकी १० वर्षांची ट्रेझरी यील्ड दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवसाय करत आहे. यामुळे सोने आंतरराष्ट्रीय बाजारात १९०० डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. हा साडेचार महिन्यांचा उच्च स्तर आहे. यामुळे देशातील बाजारातही किमती वाढत आहेत. जाणकारांनुसार, सोन्यातील तेजीमागे डॉलर व अमेरिकी ट्रेझरी यील्डमध्ये घट हे आहेच, मात्र महागाई व क्रिप्टोकरन्सीतील अनिश्चिततेमुळेही गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.

दिवाळीपर्यंत ५३ हजारांपर्यंत शक्य
सोन्याच्या भावातील तेजी कायम राहण्याची अपेक्षा आहे. जूनमध्ये सोने ५० हजारांवर पोहोचू शकते. दिवाळीत सोने ५३ हजार प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. - अनुज गुप्ता, उपाध्यक्ष, आयआयएफएल सिक्युरिटीज

या ४ कारणांमुळे येतेय तेजी

  • डॉलर नुकताच कमकुवत दिसत आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार डॉलरऐवजी सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
  • कमोडिटीचे भाव वाढल्याने महागाईचा धोका घोंगावत आहे. जागतिक पातळीवर महागाई वाढल्यास सोन्यात गुंतवणूक वाढते.
  • अनेक गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीमध्ये शिफ्ट झाले होते. मात्र, विविध क्रिप्टोकरन्सीतील घसरणीने हे परत साेन्याकडे वळत आहेत.
  • अमेरिकी सरकारच्या १० वर्षांच्या बाँडचे यील्ड घटून १.६% पेक्षाही खाली आल्याने गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...