आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बाजाराची आता चांदी...:वर्षांनंतर चांदी 59,170 रु. किलोच्या उच्चांकावर; सोने तोळ्यामागे 50 हजारांच्या वर

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोने आणि इक्विटी सोबत वाढल्याने मोठी घट होण्याची शक्यता : तज्ञांचे मत

चांदीने बुधवारी ४,३२० रुपयांची विक्रमी झेप घेत ५९,१७० रु. प्रतिकिलोची पातळी गाठत सर्वांनाच चकित केले. २०११ नंतरचा हा चांदीचा उच्चांक आहे. दुसरीकडे सोनेही ७४१ रु. वाढल्याने ५०,१८१ प्रति किलोग्रॅमवर पोहोचले. तर शेअर बाजारत तेजीनंतरही घट राहिली.

तज्ञांचे मत : सोने आणि इक्विटी सोबत वाढल्याने मोठी घट होण्याची शक्यता

‘जेव्हा सोने आणि इक्विटीमध्ये सोबतच वाढ होते, तेव्हा शेअर बाजारातही मोठी घट होते. असे आपण २००७ आणि २०१९ मध्ये पाहिले आहे. - अजय केडिया, एमडी, केडिया अॅडव्हायझरी

चांदी : जेवढा परतावा १० वर्षांत दिला, यापैकी निम्मा ४ महिन्यांत दिला

> दशक : १२०% दर वाढले, पण उच्चांकापेक्षा अजूनही खाली

> कोरोना काळ : मार्चपासून ६७% दर वाढले आहेत

बेल्जियम, इटली, जर्मनीत आयात घटली आहे. राजस्थानातील जव्हार, कर्नाटकमधील चित्रदुर्ग-बेल्लारी, आंध्रतील गुंटूर-कुर्नूल-कडप्पामध्ये चांदीच्या खाणींवरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. किमतीही वाढल्या. तीन दिवसांत १२% दर वाढले आहेत.

सोने : १० वर्षांत दर ३ पटीने वाढले, यातील दीडपट कोरोना काळात

> दशक : ८ वर्षांत मोठा फायदा नाही, शेवटच्या २ वर्षांत तेजी

> कोरोना काळ : ४ महिन्यांतच दर ४२% पर्यंत वाढले आहेत

साधारणपणे, शेअर बाजारात मंदीच्या काळात सोन्याचा भाव वाढतो. पण, या वेळी तज्ञ वेगवेगळी कारणे सांगत आहेत. कोरोनामुळे, एप्रिल-मेमध्ये वाहतूक बंद राहिली. यामुळे २०१९ च्या तुलनेत सोन्याची आयात ९६ % घटून १३ टनांवर आली आहे.

सेन्सेक्स : कोरोनापूर्वीच्या स्थितीपेक्षा ४०८१ अंकांनी खाली

> दशक : शेअर बाजाराचा एकूण आकार तिप्पट वाढला

> कोरोना काळ : सुमारे १२ हजार अंकांची रिकव्हरी झाली

बुधवारी सेन्सेक्समध्ये ५९ अंकांची घसरण झाली. परंतु कोरोनाच्या फटक्यानंतर बाजारात ११,९८० अंशांनी वाढ झाली आहे. २३ मार्चला सेन्सेक्स या वर्षीचा नीचांक २५,९८१ वर होता. आता ३७,८७१ वर आहे.