आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात सोन्याचे वार्षिक उत्पादन १.६ टनांवरून २० टन होऊ शकते. मात्र, त्यासाठी सरकारने नोकरशाहीचे अडथळे दूर करत गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, असे झाल्यास ३,००० ते ४,००० नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. तसेच वार्षिक सुमारे ५० अब्ज डॉलर (३७,९५८ कोटी रुपये) इतक्या परदेशी भांडवलाची बचत होईल.
भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. मात्र, सोन्याच्या खाणींमध्ये खूप मागे आहे. वर्ल्ड गोल्ड काौन्सिलचे प्रादेशिक सीईओ (भारत) सोमसुंदरम पीआर म्हणाले, ‘भारत सोन्याच्या सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे. त्यामुळे येथे सोन्याच्या उत्पादनासाठी खनन क्षमता वाढवणे तर्कसंगत आहे. त्यासाठी सरकारला कायद्यात बदल करावा लागेल आणि अडथळे दूर करावे लागतील. माइन्स अँड मिनरल अॅक्टमध्ये बदल करण्याचा व नॅशनल मिनरल पॉलिसी तथा नॅशनल मिनरल एक्सप्लोरेशन पॉलिसी आणण्याचा यात समावेश आहे.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.