आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Gold Return Calculator; Gold Investment Over The Long Term? How To Invest, Options & Benefits; News And Live Updates

सोने गुंतवणूकदारांसाठी खुशखबर!:तज्ज्ञांचे मते - सोन्यात गुंतवणूकीची हीच योग्य वेळ; गेल्या 5 वर्षात सोन्याने 56 टक्के दिला परतावा, 50 वर्षात 184 रुपयांवरुन 48 हजारांवर पोहोचले सोने

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 वर्षात 1 लाखांपर्यंत जाऊ शकते सोने

देशात सोन्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या जून तिमाहीपेक्षा यावर्षीच्या जून तिमाहीत या मागणीत 19.2 टक्के वाढ झाली आहे. जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर हीच योग्य वेळ असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. कारण येत्या काही दिवसात सोने आपल्याला योग्य परतावा देऊ शकतो.

सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक कधीही फायदेशीर आहे. गेल्या 5 वर्षाची तुलना केल्यास सोन्याने 56 टक्के परतावा दिला असून वर्षाला हे 11 टक्के आहे. 2016 मध्ये सोन्याचे भाव 10 ग्रामसाठी 31 हजार रुपये होते. परंतु, आता तेच भाव 48 हजार रुपये आहे. म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याऱ्यांसाठी हीच योग्य वेळ असल्याचे तज्ञ सांगत आहे.

गेल्या 50 वर्षात सोन्यात 261 पटीने वाढ
भारत देशात सोन्याचे भाव दिवसेदिवस वाढतच आहे. 1970 च्या तुलनेत सध्याचे भाव 261 पटीने वाढले आहे. विशेष म्हणजे 1970 मध्ये सोन्याचे भाव 184 रुपये प्रति 10 ग्राम होते. परंतु, आता 10 ग्रामसाठी 48 हजार रुपये मोजावे लागतात.

गेल्या वर्षी 56 हजारांपर्यंत भाव
सोने गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये 56 हजार प्रति 10 ग्रामवर होते. परंतु, लसीकरणानंतर यामध्ये थोडी घट पाहायला मिळाली. मार्च 2021 मध्ये हे भाव 43 हजार रुपये असून आता 48 हजारांवर आहे.

5 वर्षात 1 लाखांपर्यंत जाऊ शकते सोने
स्पेन क्वाड्रिगा फंडच्या मते, पुढील 3 ते 5 वर्षात त्याची किंमत 3,000 ते 5000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच भारतीय भाषेत याची किंमत 78,690 ते 1,31,140 रुपये प्रति 10 ग्रॅम होईल. तर दुसरीकडे, IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता सांगतात की, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था प्रगतीपथावर येण्यासाठी वेळ लागेल. या कारणास्तव सोने आपल्यासाठी फायदेशीर ठरत असून त्याचे भाव एका वर्षात 60 हजारांवर जाईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

सोन्यात सध्या जास्त वाढ अपेक्षित नाही
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणतात की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला नाही तर सोन्यात फारशी वाढ होण्याची आशा नसल्याचे मेहता यांनी सांगितले आहे.

सोन्यात गुंतवणूक करून पैसे कमवत आहे लोक
भोपाळच्या बुलियन असोसिएशनचे सचिव नवनीत अग्रवाल म्हणतात की, आता सोनेही सट्टेबाजीचा बाजार बनत आहे. वायदे बाजार अर्थात MCX ने मोठ मोठ्या भांडवलदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याचे मार्ग खुले केले आहेत. यामुळे ते शेअर बाजाराप्रमाणे सोन्यात गुंतवणूक करुन भाव वाढल्यावर त्यातून पैसे कमवत आहे.

भारतात दरवर्षी 800 टन सोन्याचा होतो वापर
भारत देशात मोठ्या प्रमाणात सोन्याची उलाढाल होत असून दरवर्षी 700-800 टन सोन्याचा वापर करण्यात येतो. परंतु, भारतात केवळ 1 टन सोनेच तयार होते, उर्वरित सोने आयात केले जाते. देशात 2020 मध्ये सोन्याची आयात 344.2 टन होती, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 47% कमी होती. भारताने 2019 मध्ये 646.8 टन सोने आयात केले होते.

बातम्या आणखी आहेत...