आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये सोने चकाकले:कोरोना काळातही सोने परतावा अक्षय, 19% रिटर्न

अजय कुलकर्णी | औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवा ट्रेंड : सोने खरेदीस ‘ऑनलाइन’ झळाळी

कोरोनाच्या काळात सोने गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. मार्च २०२० मधील लॉकडाऊन ते सध्याच्या ब्रेक द चेन या वर्षभरात सोन्याने १९.२० टक्के परतावा गुंतवणूकदारांच्या पदरात टाकला आहे. पारंपरिक बँक मुदत ठेवीतील परतावा एकीकडे आक्रसत असताना सोने परताव्याबाबत अक्षय ठरले आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या पहिल्या लाटेत सोन्याने आजवरची ५६ हजार ही सर्वोच्च पातळीही ऑगस्ट २०२० मध्ये गाठली होती. पारंपरिक सोने खरेदीला ऑनलाइन खरेदीची झळाळी लाभली असून सोने गुंतवणुकीतील हा नवा ट्रेंड लॉकडाऊनच्या काळात समोर आला आहे. कोरोनाचे संकट आल्यानंतर मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागला. दुसरीकडे बँकांनीहा ट्रेंड झपाट्याने बदलला व सोन्याचे दर दिवसागणिक चढू लागले. गेल्या दशकभराचा विचार करता एखाद्याने 10 वर्षांपूर्वी एक लाख रुपये सोन्यात गुंतविले असतील त्यांला दिवसाला ७०.६८ रुपये नफा झाला आहे.

नवा ट्रेंड : सोने खरेदीस ‘ऑनलाइन’ झळाळी
अक्षय्य तृतीयेला खरी झळाळी येते ती सोने खरेदीमुळे. कोविड निर्बंधांमुळे सोन्याचा पारंपरिक सराफा बाजार यंदा सलग दुसऱ्या वर्षी शांतच राहणार असला तरी ऑनलाइन खरेदी आणि इक्विटी मार्केटमधील गंुंतवणुकीच्या संधींमुळे मुहूर्त साधू इच्छिणाऱ्यांमध्ये हा झळाळता ट्रेंड रूढ होत आहे.

बँकांचे घटलेले व्याजदर, कोविडमुळे कंपन्यांना बसलेली आर्थिक झळ, शेअर बाजाराचे हेलकावे अशा वातावरणात सुरक्षित गुंतवणुकीसाठी पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. अक्षय्य तृतीया हा तर सोने खरेदीसाठी महत्त्वाचा दिवस. मात्र, लाॅकडाऊनमुळे सराफ बाजार बंद असले तरी अनेक नामवंत पेढ्यांनी ग्राहकांना अाॅनलाइन खरेदीचा पर्याय दिला अाहे. विशेष म्हणजे, सोने खरेदीचा कल कालानुरूप बदलत गेला असला तरी गुंतवणुकीसाठी भारतीयांची सर्वाधिक पसंती आजही सोन्यालाच आहे. त्यामागे कारण आहे ते अर्थातच परताव्याचे.

गेल्या ३०० वर्षांचा सोने दरवाढीचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की १७२० ते १९२० या २०० वर्षात तीन वेळेचा अपवाद वगळता दर बहुतांश स्थिर होते. मात्र, १९४० च्या दशकापासून साेन्यातून मिळणारा परतावा कायमच उत्तम राहिला अाहे, अडचणीच्या काळात साेने नेहमीच मदतीला येते. पारंपरीक गुंतवणूक म्हणून साेन्याकडे पाहिले जाते. गेल्या १० वर्षांत एक लाख रूपयांच्या गुंतवणूकीतून जर मुदतठेवींतून दिवसाला ३०.२० रूपये नफा झाला तर साेन्याने 70.68 रूपये इतका नफा दिला आहे. - चेतन राजापूरकर, संचालक, महाराष्ट्र स्टेट बाेर्ड, इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असाेसिएशन

सोने गुंतवणुकीला पाच हजार वर्षांचा इतिहास
सराफी पेढ्या बंद अाहेत त्यामुळे अक्षय्यतृतीयेला अाॅनलाइन साेने खरेदी करता येऊ शकेल. सोने गुंतवणूक सर्वोत्कृष्ट आहे. कारण, जगाच्या पाठीवर कधीही आणि कुठेही ते तात्काळ विकता येते आणि रोख रक्कम हाती पडते. सोन्याला गुंतवणुकीचा पाच हजार वर्षांचा इतिहास अाहे. खरेदीची ही उत्तम संधी अाहे. - फत्तेचंद राका, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशन

ईटीएफचा पर्याय उत्तम, जागरूकता कमी
ईटीएफ सारखे अतिशय चांगले पर्याय साेने गुंतवणूकीकरीता उपलब्ध अाहेत, मुहुर्तावर राेख पैसे माेजून साेने खरेदी अापण करताे, ते सांभाळत बसावे लागते. ईटीएफ मध्ये २०० रूपयांचेही साेने खरेदी करू शकता. शिवाय ते सहज विक्री करता येते, मात्र याबाबत, जागरूकता नाही. - सुहास वैद्य,गुंतवणूक तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...