आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Gold Rs 5,200 Cheaper In 26 Days, Below Rs 50,000 This Month, Three Main Reasons For Gold Fall

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चढ-उतार:26 दिवसांत साेने 5,200 रुपये स्वस्त, या महिन्यात 50 हजारांखाली येणार, सोन्यात घसरण येण्याची तीन प्रमुख कारणे

जयपूर/ मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नसराईत कमी किमतीत दागिने खरेदी करण्यास मिळेल फायदा

गेल्या २६ दिवसांत सोने ५,१९९.०० रुपये(९.२६%) स्वस्त झाले आहे. सात ऑगस्ट रोजी मुंबईत शुद्ध सोन्याचा भाव ५६,१२६ रु. प्रति दहा ग्रॅमच्या उच्च पातळीवर होता. गुरुवारी हा ५०,९२७ रुपये झाला आहे. जगातील शेअर बाजारांमध्ये सुधारणा पाहता या महिन्यात सोने ५०,००० रु. प्रति दहा ग्रॅमच्या खाली येऊ शकते. मात्र, दिवाळीपर्यंत हे पुन्हा ५७,००० रुपयांच्या पातळीवर पोहोचून नवा विक्रम होऊ शकतो. कमोडिटी तज्ञ आणि सराफ हा अंदाज बांधत आहेत. त्यांच्यानुसार, उच्च किमतींवर नफावसुली आणि सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमकुवत झाल्याने सप्टेंबरमध्ये सोने सध्याच्या पातळीपेक्षा पाच ते सहा टक्के स्वस्त होऊ शकते. म्हणजे, ४७,८७० ते ४८,३८० रु. प्रति दहा ग्रॅम भावावर विकू शकते. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या लग्नसराईसाठी दागिने खरेदीसाठी इच्छुक लोकांना कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, गुरुवारी सोन्याचा भाव २५७ रु.(०.५०%)ची घट आली आणि हा ५०,९२७ रु. प्रती १० ग्रॅम राहिली.

सोन्यात घसरण येण्याची तीन प्रमुख कारणे
1. जगातील शेअर बाजारांमध्ये सुधारणा आल्याने सोन्याच्या मागणीत घट येण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात हा १,९०० डॉलरवरून घटून १,८८६५ डॉलर प्रति औंसखाली येऊ शकतो.
2. ज्या गुंतवणूकदारांनी सोन्यात पैसा गुंतवला आहे, ते उच्च पातळीवर नफावसुलीसाठी विक्री जास्त करू शकतात. विक्री वाढल्याने सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल राहील.
3. अमेरिकेत घरांच्या विक्रीचे आकडे चांगले झाले आहेत. यामुळे सराफा बाजारातील धारणा बदलली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतींवर दबाव पाहायला मिळाला आहे.

गेल्या २६ दिवसांत चांदी १०,६२० रु. स्वस्त झाली
गेल्या २६ दिवसांत चांदीची किंमत प्रतिकिलाे १०,६२० रु.(१४.१६%) स्वस्त झाली आहे. ७ आॅगस्ट राेजी चांदीचा भाव ७५,०१३ रु. प्रतिकिलाे हाेता. गुरुवारी हा भाव ६४,३९३ रु. प्रतिकिलाे राहिला. बुधवारच्या तुलनेत हा १,५२८ रु. स्वस्त झाला. बुधवारी चांदी ६५,९२१ रु. प्रतिकिलाे हाेती.