आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Gold Silver Current Price Updates, 5th December 2022 Latest Rates, Sona Chandi Mumbai Delhi Rates

सोने 54 हजारांवर:चांदीही 66 हजारांच्या जवळ, येत्या काही दिवसांत भाव आणखी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज म्हणजेच सोमवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 5 डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोने 316 रुपयांनी महागून 53,972 रुपयांवर पोहोचले.

कॅरेटनुसार सोन्याची किंमत

कॅरेटभाव (रुपये/10 ग्रॅम)
2453,972
2353,756
2249,438
1840,479

चांदीही 66 हजारांच्या जवळ

चांदीबद्दल सांगायचे तर ती 66 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. सराफा बाजारात चांदी 1,457 रुपयांनी महागून 65,891 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. 2 डिसेंबर रोजी चांदी 64,434 हजारांवर होती.

पुढील वर्षी सोने 61,000 पर्यंत जाण्याची शक्यता

केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, चीनमध्ये 22 जानेवारीपासून नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू होत आहे. या काळात सोन्याची सर्वाधिक खरेदी तेथे होते. याशिवाय जगभरातील केंद्रीय बँका सातत्याने सोन्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्याची वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, सोन्यासारख्या कमोडिटीतील तेजी सामान्यतः दीर्घकाळ टिकते. पुढील वर्षी सोने 60-61 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा आमचा अंदाज आहे.

मिस कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर

सोने-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. यामध्ये तुम्ही नवे दर तपासू शकता.

बातम्या आणखी आहेत...