आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Gold silver, Palm Oil Can Be Expensive; Increase In Minimum Import Price By 62 Dollars

महागाई वाढणार:सोने-चांदी, पाम ऑइल होऊ शकते महाग; किमान आयात किमतीत 62 डॉलरची वाढ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अांतरराष्ट्रीय बाजारात वाढत्या किमतीमुळे सरकारने सोने-चांदी आणि पाम ऑयलच्या किमान आयात किमती (बीआयपी) ६२ डॉलर म्हणजेच ५,१२४ रुपये प्रति टनपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात त्यांच्या किमती वाढु शकतात. स्वस्त पामतेलाची आयात वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात खाद्यतेल आणि त्यासंबंधित वस्तूंच्या किमती कमी होत्या. मात्र आता त्यात वाढ होऊ शकते. तथापि, सरकारने साबण, वॉशिंग पावडर, मेणबत्त्या, स्वच्छता उत्पादने आणि वैयक्तिक काळजी उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आरबीडी पामोलिन आणि क्रूड सोया तेलाच्या किमान आयात किमती कमी केल्या आहेत.

किमान आयात किंमतीनुसार शुल्क-कर
जागतिक बाजारात पाम तेल आणि सोने-चांदीच्या किमतीत उसळी आल्यानंतर भारतीय आयातदारांवर दबाव वाढतो. सरकार देशांतर्गत बाजारात किमतीं जागतिक बाजारानुसार ठेवण्यासाठी प्रत्येक १५ दिवसात न्यूनतम आयात मुल्यांची समीक्षा करत असते. सरकार किमान आयात किमतीच्या आधारे शुल्क आणि कर लावते. भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार तर चांदीचा सर्वात मोठा आयातदार आहे.

चांदीवर सर्वाधिक ६२ डॉलर वाढला बीआयपी

कमोडिटी नवा बीआयपी जुना बीआयपी क्रूड पाम ऑइल 977 (80,885 रु) 971 (80,389 रु) आरबीडी पाम ऑइल 979 (81,061 रु) 977 (80,871 रु) आरबीडी पामोलिन 988 (81,781 रु) 993 (82,195 रु) क्रूड सोया ऑइल 1,275 (1,05,534 रु) 1,360 (1,12,569 रु) गोल्ड 582 (48,173 रु) 565 (46,766 रु) सिल्व्हर 771 (63,824 रु) 699 (57,864 रु) (सर्व तेलांचा बीआयपी डॉलरमध्ये प्रति टन, सोने डॉलर प्रति १० ग्रॅम, चांदी डॉलर प्रति किलो)

बातम्या आणखी आहेत...