आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्या-चांदीच्या दरात दिलासा:सोन्याचा भाव 51 हजारांवर, चांदीच्या दरातही घसरण, 61 हजार रुपये प्रति किलोवर

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सराफा बाजारात सोने 105 रुपयांनी घसरून 51,064 रुपयांवर आले आहे. मात्र, आज वायदे बाजारात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. एमसीएक्सवर दुपारी 1 वाजता सोने 39 रुपयांच्या वाढीसह 50,873 रुपयांवर व्यवहार करत आहे.

कॅरेटनुसार सोन्याची किंमत

कॅरेटकिंमत (रु./10 ग्रॅम)
2451,064
2350,860
2246,775
1838,298

चांदीच्या दरातही घसरण

चांदीच्या दराचा विचार केल्यास, सराफा बाजारात चांदी 509 रुपयांनी स्वस्त होऊन 61,067 रुपये प्रति किलोवर आली आहे. MCX वर देखील, चांदी दुपारी 1 वाजता 130 रुपयांनी घसरून 60,807 रुपयांवर व्यवहार करत होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,842 डॉलरवर

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर, सोने 1,841.99 डॉलर प्रति औंसवर आले आहे. दुसरीकडे, चांदीचा विचार केल्यास तर चांदी 21.61 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

सोन्याचे दर वाढण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते, वाढती महागाई आणि शेअर बाजारातील घसरण यामुळे सोन्यात गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. या वर्षाअखेरीस सोने 55 हजारांवर जाऊ शकते.

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर मिळवा

सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मॅसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता.

सुवर्ण रोख्यात गुंतवणुकीची संधी

सोव्हरेन गोल्ड बाँड योजनेचा 2022-23 चा पहिला हप्ता 20 ते 24 जून म्हणजेच 5 दिवसांसाठी खरेदीसाठी खुला करण्यात आला आहे. यासाठी इश्यूची किंमत 5,091 रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट करण्यासाठी, तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. म्हणजेच 1 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 5,041 रुपये मोजावे लागतील. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...