आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्या-चांदीचे भाव वधारले:सोने 51 हजार आणि चांदी 54 हजारांच्या जवळ पोहोचली, भाव आणखी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज म्हणजेच मंगळवारीही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली बघायला मिळाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 6 सप्टेंबर रोजी सराफा बाजारात सोने 95 रुपयांनी महागून 50,865 रुपये झाले आहे. फ्युचर्स मार्केटबद्दल बोलायचे झाले तर एमसीएक्सवर दुपारी 1 वाजता सोने 127 रुपयांच्या वाढीसह 50,560 रुपयांवर ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांतही त्यात आणखी वाढ होऊ शकते.

कॅरेटनुसार सोन्याची किंमत

कॅरेटकिंमत (रु./10 ग्रॅम)
2450,865
2350,661
2246,592
1838,149

चांदीच्या दरातही वाढ
चांदी 264 रुपयांनी महागून 53,627 रुपये किलो झाली आहे. तर एमसीएक्सवर दुपारी 1 वाजता चांदी 591 रुपयांच्या वाढीसह 53,981 रुपयांवर ट्रेड करत होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,715 डॉलरवर पोहोचले
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,715.33 डॉलर प्रति औंस (औंस हे सोने मापनाचे आंतरराष्ट्रीय परिमाण आहे, 1 औंस म्हणजे 28.35 ग्रॅम होतात.) आणि चांदी 18.37 डॉलर प्रति औंस आहे.

कॅरेटने ठरवली जाते सोन्याची शुद्धता
24 कॅरेटचे सोने हे सर्वात शुद्ध सोने आहे. हे इतर कोणत्याही धातूमध्ये मिसळले जात नाही. त्याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हटले जाते. 22 कॅरेट सोन्यात 91.67% शुद्ध सोने असते. इतर 8.33% इतर धातूंचा समावेश असतो. तर 21 कॅरेट सोन्यात 87.5% शुद्ध सोने असते. 18 कॅरेटमध्ये 75% शुद्ध सोने आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5% शुद्ध सोने असते.

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. येथे तुम्ही नवीन दर तपासू शकता.

बातम्या आणखी आहेत...