आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Gold Silver Price 9th August Update; Sona Chandi Ka Rate Per Gram Kya Hai In India Mumbai Delhi; News And Live Updates

सोने खरेदीची चांगली संधी:46 हजारांवर आले सोने, एका वर्षात 10 हजाराने स्वस्त झाले सोने: चांदी ही 64 हजाराच्या खाली

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2700 रुपयांनी स्वस्त झाली चांदी

देशात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. वायदा बाजारात आज सकाळी 11 वाजता 556 रुपयाने कमी होत 46 हजार 84 रुपयांवर ट्रेंडिंग करत होते. एमसीएक्सवर सोने 1.2 टक्क्यांनी घसरण होत गेल्या 4 महिन्यात सर्वात खाली आले आहे. इंडियन बुलीयन ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, सोने आज 1091 रुपयांनी स्वस्त होत 46 हजार 556 प्रति 10 ग्राम वर आले आहे.

2700 रुपयांनी स्वस्त झाली चांदी
आयबीजीएच्या संकेतस्थळानुसार, शुक्रवारी चांदी 66 हजार 727 रुपये प्रति किलोग्राम वर होती. जी आज 64 हजार 25 रुपये वर आली असून यामध्ये 2,702 रुपयांनी घट झाली आहे. तर MCX वर सकाळी 11 वाजता 1,206 रुपयांनी घसरण 63 हजार 694 रुपये प्रति किलो ग्रामवर ट्रेंड करत होती.

ग्लोबल मार्केटमध्ये सोन्या चांदीत घसरण
ग्लोबल मार्केट ची गोष्ट केल्यास आज सोने 1,722 डॉलर प्रति औस आले होते. याव्यतिरिक्त चांदीही 24 डॉलर प्रति औसवर आली होती. 1 ऑगस्टला सोने 1,830 रुपया डॉलर होते.

गेल्या 50 वर्षात सोन्यात 261 पटीने वाढ
भारत देशात सोन्याचे भाव दिवसेदिवस वाढतच आहे. 1970 च्या तुलनेत सध्याचे भाव 261 पटीने वाढले आहे. विशेष म्हणजे 1970 मध्ये सोन्याचे भाव 184 रुपये प्रति 10 ग्राम होते. परंतु, आता 10 ग्रामसाठी 48 हजार रुपये मोजावे लागतात.

गेल्या वर्षी 56 हजारांपर्यंत भाव
सोने गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये 56 हजार प्रति 10 ग्रामवर होते. परंतु, लसीकरणानंतर यामध्ये थोडी घट पाहायला मिळाली. मार्च 2021 मध्ये हे भाव 43 हजार रुपये असून आता 48 हजारांवर आहे.

5 वर्षात 1 लाखांपर्यंत जाऊ शकते सोने
स्पेन क्वाड्रिगा फंडच्या मते, पुढील 3 ते 5 वर्षात त्याची किंमत 3,000 ते 5000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच भारतीय भाषेत याची किंमत 78,690 ते 1,31,140 रुपये प्रति 10 ग्रॅम होईल. तर दुसरीकडे, IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता सांगतात की, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था प्रगतीपथावर येण्यासाठी वेळ लागेल. या कारणास्तव सोने आपल्यासाठी फायदेशीर ठरत असून त्याचे भाव एका वर्षात 60 हजारांवर जाईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

बातम्या आणखी आहेत...