आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, आज म्हणजेच बुधवारी (5 एप्रिल) सोन्याने आपला नवा उच्चांक गाठला आहे. आज सराफा बाजारात सोने 1,262 रुपयांनी महाग होऊन 60,977 रुपयांवर पोहोचले आहे. यापूर्वी 31 मार्च रोजी सोन्याने 59,751 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता.
याशिवाय चांदीनेही 74 हजारांचा टप्पा पार केला आहे. IBJA नुसार, आज सराफा बाजारात चांदी 2,822 रुपयांनी महागली आणि 74,522 रुपयांवर पोहोचली. चांदीच्या दराची ही 31 महिन्यानंतरची उच्च पातळी आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे दर घ्या जाणून
कॅरेट | किंमत (रुपये/10 ग्रॅम) |
24 | 60,977 |
23 | 60,733 |
22 | 55,855 |
18 | 45,733 |
सोन्याचे दर जाऊ शकतात 65 हजारांपर्यंत
केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, 2020 मध्ये सुरू झालेली गोल्ड सुपर सायकल अजूनही सुरू आहे. या वर्षी सोने 62,000 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज होता, परंतु सध्याच्या परिस्थिती पाहता ते 64,000 पर्यंत पोहोचू शकते.
IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता सांगतात की, शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे सोन्याला आधार मिळत आहे. यामुळे या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊ शकतो.
सोन्याचा भाव 10 वर्षात दुपटीने वाढला आहे
गेल्या 10 वर्षात सोन्याने 110% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एप्रिल 2013 मध्ये सोन्याचा दर 29 हजार रुपये होता, तो आता 61 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 20 एप्रिल 2022 रोजी सोन्याचा भाव 51 हजार रुपये होता. म्हणजेच गेल्या 1 वर्षातच सोन्याने सुमारे 20% परतावा दिला आहे.
गेल्या 10 वर्षात सोन्याच्या भावात झाला बदल
दिनांक | किंमत |
5 एप्रिल 2013 | 29,704 |
5 एप्रिल 2014 | 28,246 |
5 एप्रिल 2015 | 26,597 |
5 एप्रिल 2016 | 28,655 |
5 एप्रिल 2017 | 28,677 |
5 एप्रिल 2018 | 30,350 |
5 एप्रिल 2019 | 31,601 |
5 एप्रिल 2020 | 43,712 |
5 एप्रिल 2021 | 45,023 |
5 एप्रिल 2022 | 51,401 |
5 एप्रिल 2023 | 60,977 |
रुपये प्रति 10 ग्रॅम किंमत
(स्रोत: गोल्ड प्राईज इंडिया डॉट कॉम आणि इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशन)
सोन्यात मर्यादित गुंतवणूक ठरते फायदेशीर
IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (वस्तू आणि चलन) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, तुम्हाला जरी सोन्यात गुंतवणूक करणे आवडत असले तरी तुम्ही त्यात मर्यादित गुंतवणूक केली पाहिजे. तज्ञांच्या मते, एकूण पोर्टफोलिओपैकी फक्त 10 ते 15% सोन्यात गुंतवणूक करावी. सोन्यात गुंतवणूक केल्याने संकटाच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता मिळू शकते. परंतू त्यामुळे दीर्घकाळात तुमच्या पोर्टफोलिओचा परतावा कमी होऊ शकतो. सोन्यात किमान 3 ते 5 वर्षे गुंतवणूक करणे अतिशय योग्य ठरते.
आता फक्त हॉलमार्क असलेले सोन्याची विक्री होणार
1 एप्रिलपासून सोन्याबाबत नवे नियम लागू झाले आहेत. नवीन नियमानुसार सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंगशिवाय सोने विकले जाणार नाही. ज्याप्रमाणे आधार कार्डमध्ये 12 अंकी कोड असतो, त्याचप्रमाणे सोन्याला 6 अंकी हॉलमार्क कोड असतो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID म्हणतात.
ही संख्या अल्फान्यूमेरिक असू शकते म्हणजे असे काहीतरी- AZ4524. या क्रमांकाद्वारे सोने किती कॅरेटचे आहे हे शोधणे शक्य होणार आहे. देशभरात सोन्यावर ट्रेड मार्क देण्यासाठी 940 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. आता चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद होणार आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.