आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने-चांदीचे दर झेपावले:सोने 55,113 पार, चांदी 68 हजारांच्यावर पोहोचली, भाव आणखी वाढण्याची शक्यता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाच्या पहिल्याच सोमवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 2 जानेवारी रोजी सराफा बाजारात सोने 246 रुपयांनी महागून 55,113 रुपयांवर पोहोचले आहे.

कॅरेटनुसार सोन्याची किंमत

कॅरेटभाव (रुपये/10 ग्राम)
2455,113
2354,892
2250,484
1841,335

साडे 68 हजारांच्या पुढे चांदी
सराफा बाजारात आज चांदी 435 रुपयांनी महागून 68,527 रुपये किलो झाली आहे. 31 डिसेंबर रोजी चांदी 68,092 हजारांवर होती.

सोन्याचा भाव 64,000 पर्यंत जाण्याची शक्यता
आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, RBI सारख्या जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याचा साठा वाढवला आहे. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, केंद्रीय बँकांकडून सोन्याची वाढती खरेदी हे सकारात्मक लक्षण आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीला आधार मिळेल. अजय केडिया म्हणाले की, 2023 मध्ये सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

2022 हे वर्ष सोने आणि चांदीसाठी चांगले
2022 मध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. गेल्या वर्षी सोन्याचा भाव 48,279 रुपयांवरून 54,867 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. म्हणजेच 2022 मध्ये सोन्याचा भाव 6,588 रुपयांनी वाढला. दुसरीकडे, चांदी 62,035 रुपयांवरून 68,092 रुपये प्रति किलो झाली आहे. म्हणजेच 2022 मध्ये त्याची किंमत 6,057 रुपयांनी वाढली आहे.

मिस कॉल देऊन सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. यामध्ये तुम्ही नवीनतम दर तपासू शकता.

1947 पासून सोने 590 पट महागले

आपल्या देशात लग्नसमारंभ किंवा सणासुदीला सोने खरेदी करण्याचा ट्रेंड आहे. आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या 75 वर्षांत सोने-चांदी वेगाने महाग झाली आहे. 1947 मध्ये सोन्याचा दर 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आता 52 हजारांच्या पुढे गेला आहे. तर चांदीचा भाव 107 रुपये किलो होता, तो आता 58 हजारांच्या वर गेला आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...