आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफा बाजार:चांदी 700 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे भावही घसरले, पाहा आजचे दर

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरामध्ये चढ-उतार सुरूच आहे. आज सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. 999 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज 51,045 रुपयांनी विक्री होत आहे. तर एक किलो चांदीचा भावही खाली आला असून चांदी 60,733 रुपयांनी विकली जात आहे.

वास्तविक हे दर बाजारातील असून किरकोळ बाजारात यावर जीएसटीसह इतर कर लावले जातात. त्यामुळे स्थानिक बाजारात सोने तसेच चांदीचे दर या पेक्षा जास्त असतात. असे असले तरी, काही प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

भारतीय सराफा बाजारातील बुधवारी जाहीर झालेले सोन्या-चांदीचे दर पाहिले तर त्यात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. आज सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. 999 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज 51,045 रुपयांना विकले जात आहे, तर एक किलो चांदीचा भावही खाली आला असून आता 60,733 रुपयांनी विकली जात आहे. मागील दिवसाच्या तुलनेत आज चांदीच्या दरात झालेली ही 700 रुपयांनी घट आहे.

सर्व प्रकरच्या सोन्या-चांदीत घसरण

सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. एकदा सकाळी आणि दुसरी संध्याकाळी. आज जाहीर झालेल्या किमतीनुसार सोन्या-चांदीची सर्व प्रकारची शुद्धता असलेल्या दरात ही घसरण दिसून आली आहे. 995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने 50,841 रुपये झाले असून 916 शुद्धतेचे सोने 46,575 रुपयांना विक्री होत आहे.

बातम्या आणखी आहेत...