आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ उतारामुळे देशभरातील सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली आहे. दरम्यान, मंगळवारी सोन्याच्या भावात देखील मोठी वाढ झाली आहे. आज मंगळवारी (14 मार्च) सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली. इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) की वेबसाइटनुसार, सराफा बाजारात सोने 804 रुपयांनी महागले असून 57,772 रुपयांवर पोहोचले आहे. यापूर्वी सोमवारी सोन्याची किंमत 1300 रुपयांनी ज्यास्त झाली होती.
कॅरेटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे
कॅरेट | दर (रपये/10 ग्रॅम) |
24 | 57,772 |
23 | 57,541 |
22 | 52,919 |
18 | 43,329 |
चांदी 67 हजारांच्या जवळ पोहोचली
जर चांदीबद्दल विचार केला तर आज त्याची किंमत 2,955 रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर चांदीचा दर 66,621 रुपये किलोवर पोहोचला आहे. 13 मार्च रोजी तो 63,666 हजारांवर होता.
गेल्या महिन्यात सोने 59 हजारांच्या जवळ पोहोचले होते
2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव सर्वकालीन उच्चांकावर होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, तेव्हा सोने 58,882 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर सोन्यात घसरण झाली. आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव चढू लागला आहे.
१ एप्रिलपासून फक्त 6 अंकी हॉलमार्किंग सोन्याची विक्री होणार
नवीन नियमानुसार 1 एप्रिलपासून केवळ सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. त्याशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. तसेच चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. हॉलमार्क केलेले सोने ओळखणे सोपे जाईल. कारण ज्याप्रमाणे आधार कार्डमध्ये 12 अंकी कोड असतो, त्याचप्रमाणे सोन्याला 6 अंकी हॉलमार्क कोड असतो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID म्हणतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.