आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच 6 मार्च रोजी सोन्याचा भाव 56,108 रुपये होता. जो आता 11 मार्च रोजी 55,669 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला
कॅरेटनुसार जाणून घ्या सोन्या चांदीचे दर
कॅरेट | दर (रुपये/10 ग्रॅम) |
24 | 55,669 |
23 | 55,446 |
22 | 50,993 |
18 | 41,752 |
चांदी 62 हजारांच्या खाली आली
IBJA च्या वेबसाइटनुसार, या आठवड्यात चांदीच्या दरात अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 64,293 रुपये होती. आता 61,791 रुपये प्रति किलोवर आली आहे. म्हणजेच या आठवड्यात चांदी 2,502 रुपयांनी कमी झाली आहे.
एप्रिलमध्ये सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता
आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात की देशांतर्गत बाजारात भौतिक मागणी कमकुवत आहे. सोन्याचे भाव मार्चपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. अक्षय्य तृतीया एप्रिलमध्ये आहे, नवरात्रही याच महिन्यात येत आहे. नवरात्रीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोक खरेदी करतात. त्यामुळे एप्रिलमध्ये मागणी वाढण्याची शक्यता आहे.
मिस कॉल देऊन सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. यामध्ये तुम्ही नवीनतम दर तपासू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.