आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विश्लेषण:सोन्या-चांदीचे गुणोत्तर 83 पार; चांदीचा भाव 85,000 पर्यंत जाण्याची शक्यता

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्याचे भाव सध्या चांदीच्या तुलनेत खूप जास्त आहेत. सोन्या-चांदीचे प्रमाण सध्या ८३ च्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत चांदीमध्ये गुंतवणूक वाढेल आणि एका वर्षात पांढऱ्या धातूच्या किमती ८५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊ शकतात. शुक्रवारी अायबीजेएवर चांदीची किंमत ६२,७८८ रुपये प्रतिकिलो होती. एक औंस सोन्याने किती चांदी खरेदी केली जाऊ शकते हे साेने-चांदी गुणाेत्तर सांगते. उच्च गुणोत्तर म्हणजे सोन्याची किंमत जास्त आहे, तर कमी गुणोत्तर म्हणजे चांदी महाग आहे. सोन्याचे-चांदीचे प्रमाण ६२ च्या आसपास आहे, जे सध्या ८३ च्या वर आहे. केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणतात, १२ मे रोजी सोन्या-चांदीचे गुणोत्तर या वर्षीच्या उच्चांकी ८९ वर होते, जे आता ८३.६४ वर आले आहे. याचा अर्थ चांदीचा भाव वाढत आहे. हा तेजीचा कल कायम राहील. यामुळे एका वर्षात चांदी ८५ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार चांदीच्या किमतीत वाढ होण्याची अनेक कारणे आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे लोक गुंतवणुकीसाठी चांदीकडे वळत आहेत. स्टर्लिंग सिल्व्हर आणि गोल्ड प्लेटेड चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. चांदीची जागतिक मागणी या वर्षी विक्रमी ३४,७५० टनांवर जाण्याची शक्यता आहे. दागिन्यांची मागणी ११% वाढण्याची अपेक्षा आहे, तर चांदीच्या वस्तूंच्या मागणीत २३% वाढ अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त फोटोव्होल्टेइक वापर, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मागणी १२% वाढण्याचा अंदाज आहे. परंतु चांदीचे खाणकाम गेल्या एक दशकापासून स्थिर आहे.जेम्स अँड ज्वेलरी डाेमॅस्टिक काैन्सिलचे सदस्य हेमंत गुप्ता यांच्या मते, भारतात चांदीचे भवितव्य चांगले आहे. चांदीच्या दागिन्यांची मागणीदेखील गेल्या काही वर्षांत ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ ली आहे. किमतीतील वाढ यापुढेदेखील कायम राहणार आहे.

-२०२२ मध्ये चांदीची भौतिक मागणी १३% वाढून ७ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. -२०१९ पूर्वी ४ वर्षे खाणकामात घट होऊन चांदीची खाण गेल्या दशकापासून स्थिर आहे -गेल्या एक दशकात चांदीची कामगिरी कमी आहे आणि त्याच्या किमती फारशा वाढलेल्या नाहीत.

चांदीची कामगिरी कमी, पण आता क्षेत्राला वेग
^या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर चांदीने कमी कामगिरी केली आहे, परंतु आता त्याला वेग आला आहे. याचे कारण सोन्याच्या किमतीमुळे दागिने क्षेत्रातील चांदीची मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक मागणीही सातत्याने वाढत आहे. चांदी एका वर्षात ८५ ते ९० हजारांचा आकडा गाठू शकते. - अजय केडिया, संचालक, केडिया अ‍ॅडव्हायझरी

बातम्या आणखी आहेत...