आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविक्रमी किमतीवर पोहोचल्यानंतर सोन्याच्या किमतीतील मोठ्या घसरणीचा थेट परिणाम सोने कर्जाच्या व्यवसायावर दिसत आहे. बुडीत कर्जाची जोखीमही कमी व्हावी यासाठी सोने कर्ज देणाऱ्या एनबीएफसी कर्जाचा अवधी घटवत असून ग्राहकांकडून जास्त सोने तारण ठेवण्याची मागणी करत आहे. सोने कर्ज बाजारातील अग्रणी कंपनी मुथूट फायनान्स जे लोक कमीत कमी अवधीत कर्जफेड करण्याची तयारी दर्शवत आहेत त्यांना व्याजदरांत सूट आणि अन्य सवलती ऑफर करत आहेत. दुसरीकडे प्रतिस्पर्धी कंपनी मुथूट मिनी फायनान्सर्स आता बहुतांश सोने कर्ज ९० दिवसांसाठी देत आहे. पहिली कंपनी सरासरी २७० दिवसांसाठी कर्ज देत होती. याशिवाय बहुतांश मोठ्या एनबीएफसी (बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या) आणि बँक नियामकाकडून निश्चित मर्यादेपेक्षा कमी सोने देत आहे.
एनबीएफसीसाठी ही सीमा सोन्याच्या मूल्याच्या ७५ टक्के आणि बँकांसाठी ९० टक्के निश्चित केली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे टाळेबंदी लादल्याने ज्यांना व्यवसायात फटका बसला अशांनी मोठ्या प्रमाणात सोने कर्ज घेतले होते. याच पद्धतीने त्यांनी कमी गुंतवणुकीत विदेशी फंडाची व्यवस्था केली आणि व्यवसाय रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे २०२० मध्ये मुथूट फायनान्सचे लोन बुक २५ टक्के वाढले आणि कंपनीकडे तारण सोने वाढून १४६ टनापर्यंत पोहोचले. मुथूट फायनान्सचे एमडी जॉर्ज मुथूट अलेक्झांडर म्हणाले, लोक दागिन्यांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतात. सोन्याची किंमत घटल्यानंतरही सोने कर्ज फेडून दागिने परत मिळवण्याची इच्छा असते.
लोन बुकमध्ये घसरण शक्य
जानेवारी-मार्च तिमाहीत मुथूट फायनान्स व मण्णपुरम फायनान्सचे सोने कर्ज एयूएममध्ये १.५-२ %घसरण येऊ शकते. अॅसेट क्वॉलिटी चांगली राहील. - रेना कॉक, कर्ज विश्लेषक
बॅड लोन रेशो कमी
केपीएमजीनुसार, मार्च २०२२ पर्यंत भारतात सोने कर्ज बाजारपेठ ३४ टक्के वाढून ४.६ लाख कोटी रु. झाली. या श्रेणीतचा बॅड लोन रेशो सुमारे १ टक्के आहे. बँकिंग क्षेत्राचा ७.५ टक्के आहे.
७ महिन्यांत २० टक्क्यांपर्यंत घटल्या पिवळ्या धातूच्या किमती
ऑगस्ट २०२० मध्ये विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर आता सोन्याच्या किमतीत २० टक्क्यांपेक्षा जास्त घसरण आली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून अर्थव्यवस्था रुळावर आल्यानंतर ज्यात जास्त कमाई करता येईल अशा संपत्तीत पैसे टाकू लागले आहेत. अशा स्थितीत सोन्याच्या किमती घटतात. सध्या देशात सोन्याची किंमत एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहे. यादरम्यान सोने कर्ज बुडीत होण्याची शक्यता वाढली आहे. कारण, कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे आणि रोज १ लाखापेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत. अशा स्थितीत अनेक व्यवसायांवर पाणी पडू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.