आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांपासून टू-व्हीलर इंडस्ट्रीमध्ये मंंदी दिसून येत होती. मात्र या वर्षी पुढचे सहा महिने त्यांच्यासाठी चांगले दिवस येण्याची अपेक्षा. याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक पुनर्प्राप्ती, सामान्य पाऊस, कृषी उत्पादनात वाढ, शैक्षणिक संस्था आणि कार्यालये पूर्ण क्षमतेने उघडणे, येणाऱ्या दिवसांत लग्न आणि सणासुदीचा काळ असू शकतो. २०१९ मध्ये दुचाकी वाहनांची चांगली विक्री झाली होती, मात्र त्यानंतर गेल्या दोन वर्षात कोरोना-१९च्या प्रकोपामुळे वाहनांच्या एकूण विक्रीबरोबरच दुचाकी वाहनांच्या विक्रीवरही परिणाम झाला होता. या वर्षी एप्रिलपासून दुचाकींच्या विक्रीत वर्षभराच्या आधारे वाढ दिसून येते. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा)च्या सर्वेक्षणात अर्ध्यापेक्षा जास्त ५०.३% डीलर्सनी विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. दोन वर्षांत दुसऱ्या सहा महिन्यांत (जुलै-डिसेंबर) मध्ये ६६-६७ लाख दुचाकी वाहने विकली होती. या अर्थाने या वर्षाच्या उत्तरार्धात विक्रीचा आकडा ७० ते ७५ लाखांपर्यंत जाऊ शकतो.
दुचाकींची विक्री वाढण्याची कारणे
एप्रिल-जून तिमाहीत दुचाकींची विक्री
महिना 2021 2022 वृद्धी एप्रिल 8,65,628 11,94,520 37.99% मे 4,10,871 2,22,994 197.66% जून 9,30,825 11,19,096 20.23%
चांगल्या पावासामुळे ग्रामीण भागात कमाई वाढण्याची अपेक्षा. टू-व्हीलरची बहुतांश विक्री येथेच होते. पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. सणासुदीत वाहन विकत घेण्याची परंपरा, ओईएमद्वारे नव्या लाँचिंगपासून विक्रीला चालना देणे अपेक्षित.
सणासुदीत होईल लाँचिंग
इंडस्ट्रीशी संबंधित लोकांच्या मते, गेल्या दोन वर्षांच्या तुलतनेत या वर्षी ऑटोमोबाइल निर्माते नव्या गाड्या बाजारात आणतील. फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांच्या मते, गेल्या वर्षी सणांचा काळ सर्वात वाईट काळ होता. मात्र येणारा ४ ते ५ महिन्यांचा काळ विक्रीसाठी खूप चांगला राहण्याची अपेक्षा आहे. डीलरशिपमध्ये चांगली चौकशी पाहायला मिळत आहे.
आर्थिक सुधारणांचा परिणाम
^देशात २०१९ मध्ये सर्वात जास्त २.१२ कोटी दुचाकींची विक्री झाली होती. यानंतर सलग घसरण दिसली. गेल्या तिमाहीत वार्षिक आधारावर विक्रीत ५४.3%ची वृद्धी राहिली. आर्थिक सुधारणा, चांगला मान्सून, शेतीच्या उत्पन्नात झालेली वाढ या कारणांमुळे यंदाच्या सणासुदीच्या हंगामात दुचाकींची विक्री चांगली होण्याची अपेक्षा .
-तुषार शहा, सह-सीईओ, केअर एज अॅडव्हायझरी अँड रिसर्च
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.