आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Good Days For Gold Market From Navaratri, Likely To Rate Rise In 2 Months; Demand For Gold Chain, Trend Of Lightweight Jewelery

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सोने बाजारात नवरात्रीपासूनच दिवाळी, 2 महिन्यांत दर वाढण्याची शक्यता; सोनसाखळीला डिमांड, लाइटवेट ज्वेलरीचा ट्रेंड

शिरीष सरोदे | जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जव्हेरी बाजारातील झळाळी परतली; दिवाळीपर्यंत जास्त उलाढालीचे संकेत

नवरात्रीपासून तेजीत असलेल्या सोने बाजारात अद्याप नववधूचा साज असलेल्या ज्वेलरीची उचल नसली तरी लाइटवेट ज्वेलरीचा ट्रेंड आहे. यात सोनसाखळीला सर्वाधिक मागणी आहे. कमी वजनाची (८-१० ग्रॅम) सोनसाखळी व त्यानंतर फॅशनेबल नेकलेस, पेंडंट, इअररिंग्ज, मंगळसूत्र, कडे, बांगड्यांना मागणी वाढली आहे.

राज्यात सुमारे ३० हजार किरकोळ विक्रेते सराफा व्यावसायिक आहेत. २०१९ च्या तुलनेत यंदा ५० ते ६० टक्के व्यवसाय होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले की सोन्याचा दर ५३ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत ते ५९००० पर्यंत पोहोचेल, अशी शक्यता आहे.

जव्हेरी बाजारातील झळाळी परतली; दिवाळीपर्यंत जास्त उलाढालीचे संकेत

राज्यात सोने बाजारातील सर्वात जास्त उलाढाल मुंबईच्या जव्हेरी बाजारात होते. येथील झळाळी परतली आहे. मुंबईनंतर पुणे, जळगाव, औरंगाबाद, नागपूरचा क्रमांक लागतो.

सुवर्णनगरीत जास्त उलाढाल

सुवर्णनगरी जळगावात दसऱ्यानंतर ग्राहकांचा कल वाढल्याने लाइटवेट दागिन्यांच्या खरेदीत दिवाळीपर्यंत अपेक्षेपेक्षा जास्त उलाढालीचे संकेत आहेत. ३ ग्रॅम, ५ ग्रॅम ते १० ग्रॅमपर्यंतचे लाइटवेट दागिने जसे इअररिंग्ज, चेन, ब्रासलेट्सला जास्त पसंती आहे.

मुंबईत ४०% व्यवहार

यंदा दिवाळीला साडेतीन ते चार टनांपर्यंत सोन्याची विक्री होईल असा अंदाज आहे. एकट्या मुंबईत महाराष्ट्राच्या ४० टक्के व्यवहार होताे. जव्हेरी बाजारातून मालाचा सर्वदूर पुरवठा होतो. येथून दक्षिण भारतात जास्त खरेदी केली जाते. दिवाळीनिमित्त १५ ते २० ग्रॅमपर्यंतच्या लाइटवेट ज्वेलरीला खूप मागणी आहे. दिवाळीनंतर सोन्याचे भाव ६-७ हजारांनी वाढतील. -सुरेंद्र मेहता, मार्केटमधील तज्ज्ञ

पुण्यासारख्या शहरात उच्च वर्गातील खरेदीदारांमध्ये पोलकी, कट डायमंड, कुंदन, गेरू पॉलिश्ड डिझाइनच्या दागिन्यांची मागणी आहे. पिवळेधमक दिसतील अशा दागिन्यांची निवड साधारण मध्यमवर्गाकडून होते.