आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Good News For EPFO Account Holders Across The Country; This Year, You Can Get A Lump Sum Interest Of 8 Per Cent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:देशभरामधील ईपीएफओ खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी; यंदा मिळू शकते एकरकमी 8.50 टक्के दराने व्याज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधी कोरोनामुळे दोन टप्प्यांत व्याज देण्याची ईपीएफओ संघटनेने केली होती घोषणा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या खातेधारकांना ८.५% दराने एकरकमी व्याज देऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, कामगार मंत्रालयाने वित्त मंत्रालयाला याबाबत एक प्रस्ताव पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, ईपीएफओने एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) म्हणजे इक्विटी विक्रीतून चांगली कमाई केली आहे. यामुळे सर्व खातेधारकांना चालू आर्थिक वर्षाचे व्याज एकरकमी दिले जाऊ शकते.

यापूर्वी ईपीएफओ ९ सप्टेंबरला सांगितले होते की, कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यामुळे व्याजाची रक्कम दोन टप्प्यांत दिली जाईल. आधी ८.१५% दराने आणि उर्वरित व्याज ०.३५% दराने मिळेल. ईपीएफओला ८५% उत्पन्न निर्धारित साधनांतून, तर १५% उत्पन्न ईटीएफच्या माध्यमातून मिळते.

अशी आहे योजना : नवी नोकरी दिल्यास २ वर्षांसाठी पीएफ कव्हरचे अनुदान मिळणार

> सरकार १२ टक्के कर्मचाऱ्यांचे अंशदान आणि १२ टक्के नियोक्तांचे अंशदान अशा दोन्ही पक्षांची रक्कम भरेल.

> योजनेच्या कक्षात १ हजार कर्मचाऱ्यांपर्यंतच्या फर्म येतील. यानुसार १५,००० रुपयांपेक्षा कमी मासिक वेतनावर ईपीएफओ-नाेंदणीकृत प्रतिष्ठानांत रोजगार मिळवणारा कोणत्याही नव्या कर्मचाऱ्याचा समावेश असेल.

> १५ हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असलेले ईपीएफ सदस्य, ज्यांनी १ मार्च २०२० ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत नोकरी गमावली व १ ऑक्टोबरपासून नवी नोकरी मिळवली, तेही या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला कॅबिनेटची मंजुरी, २२,८१० कोटींचा खर्च

केंद्राने रोजगार वृद्धीसाठी आत्मनिर्भर भारत पॅकेज ३.० अंतर्गत आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मंजुरी दिली. यामुळे कर्मचारी आणि रोजगार देणाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल. ही योजना १ ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१ पर्यंत चालेल. यासाठी सरकार २२,८१० कोटींवर रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्चणार आहे. कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार बुधवारी म्हणाले, योजनेंतर्गत ईपीएफओ-रजिस्टर्ड प्रतिष्ठानांनी आधी पीएफसाठी नाेंदणीकृत नसलेल्या किंवा रोजगार गमावलेल्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना फायदा मिळेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser