आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशांतर्गत शेअर बाजारावरील विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) एप्रिलमध्ये ११,६३० कोटी रुपयांची निव्वळ खरेदी (प्रॉफिट बुकिंग वगळता) केली. मार्चमध्ये केलेल्या ७,९३६ कोटींच्या खरेदीपेक्षा ४६.५६% अधिक आहे. यामुळे भारत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बाजारपेठांपैकी एक बनला.
बाजार विश्लेषकांच्या मते, भारतीय इक्विटीमध्ये परकीय गुंतवणूक वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मार्च तिमाहीतील कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी. याशिवाय रिझव्र्ह बँक आणि यूएस सेंट्रल बँक फेड यांच्याकडून व्याजदरात आणखी वाढ न करण्याचे संकेतही आहेत. दरम्यान, भारत आणि अमेरिकेत कमी महागाईमुळे भावना सुधारली आहे. मार्चअखेर शेअर बाजाराचे मूल्यांकन खूप चांगले झाले होते. टीसीएसमध्ये देखील, एफआयआयची होल्डिंग १२.९४% वरून १२.७२% पर्यंत घसरली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.