आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेलीकॉम:गुगल आयडियात खरेेदी करू शकते हिस्सेदारी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य बिर्ला समूहातील ही कंपनी आर्थिक संकटात

गेल्या महिनाभरात जिआे प्लॅटफाॅर्ममध्ये फेसबुकसह अन्य विदेशी गुंतवणूकदारांनी ७८,५६२ काेटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर आता गुगल देखील व्हाेडाफाेन आयडियामध्ये गुंतवणूक करण्याची संधी चाचपून पाहत आहे. देशातील वाढती माेबाइल बाजारपेठ लक्षात घेऊन जागतिक कंपन्या भारतीय दूरसंचार कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे फायनान्शियल टाइम्सच्या अहवालात नमूद केले.

व्हाेडाफाेन आयडियामधील ५%भांडवली हिस्सा गुगल खरेदी करू शकते. सध्या आदित्य बिर्ला समूहातील ही कंपनी आर्थिक संकटात सापडली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने आॅक्टाेबरमध्ये एजीआर थकबाकी पाेटी कराेेडाे रुपयांचा दंड ठाेठावल्यानंतर व्हाेडाफाेन आयडियाचे भविष्य अनिश्चित झाले हाेेते. हा व्यवहार झाल्याने व्हाेडाफाेन - आयडिया पुन्हा एकदा दूरसंचार बाजाराच्या स्पर्धेत परत येईल. एजीआर थकबाकी प्रकरणी कंपनीला माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...